कृषीपंप वीज जोडणी धोरणाची अमलबजावणी प्रभावीपणे करा : खासदार बाळू धानोरकर

55

कृषीपंप वीज जोडणी धोरणाची अमलबजावणी प्रभावीपणे करा : खासदार बाळू धानोरकर

Implement agricultural pump power connection policy effectively: MP Balu Dhanorkar
Implement agricultural pump power connection policy effectively: MP Balu Dhanorkar

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर(मारेगाव): – कृषीपंप वीजबिल थकबाकीचे कालावधीनुसार सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकी वरील व्याज आणि विलंब आकार 100 टक्के माफ व उर्वरित मूळ थकबाकीमध्ये 50 टक्के सूट व इतर बाबी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहे. या योजनेच्या कालावधी पुढील तीन वर्षासाठी 2024 पर्यटन आहे. या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता जनजागृती करून प्रभावीपणे कृषीपंप वीज जोडणी धोरणाची अमलबजावणी करण्याच्या लोकहितकारी सूचना अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.

यावेळी तहसीलदार, रवींद्र सोनकुसरे, पोलीस निरीक्षक मंडलवार, मुख्याधिकारी, देविदास काळे, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, आशिष कुलसंगे, देविदास काळे, नरेंद्र ठाकरे, अरुणाताई खंडारकर, खलीक पटेल, नगरसेवक विपलो ताकसांडे रवी पोटे, आकाश बदकी रमन डोहे यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, केंद्राच्या – राज्याच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील सर्व जनतेने मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कोरोना पासून बचाव करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. गोरगरीब जनता, शेतकरी तसेच इतर सर्वसामान्य लोकांना शासकीय काम असो अथवा इतर कोणत्याही कमला त्रास होता काम नये अन्यथा मी शांत बसणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.