चुलत भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसली मुलगी, वडिलांनी छाटले मुलीचे मुंडके.
✒️प्रशांत जगताप, क्राईम प्रतिनिधी✒️
युपी दि, 4 मार्च:- स्वताःच्या मुलीला चुलत भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत बघितल्याने संतापलेल्या बापाने आपल्या स्वताःच्या मुलीचे मुंडके छाटल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई शहरात घडली आहे. आपल्या स्वताःच्या मुलीची हत्या केल्यानंतर तिची धडावेगळे झालेले शीर घेऊन तिचे वडिल पोलीस स्टेशनला पोहोचले.
मंझिला पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणारा पांडेयतारा गावातील सर्वेस भाजीपाला विकण्याचे काम करते. काही दिवसा पासुन मुलीच्या वडिल सर्वेशला आपल्या मुलिचे नीलम वय 20 वर्ष हिचे कुणासोबत तरी अफेयर सुरू असल्याचा संशय होता. त्यामुळे वडिल हे मुलीचा मागावरच होते. अशातच दोन दिवसांपूर्वी वडिलांनी तिला व तिच्या काकाच्या मुलाला आक्षेपार्ह स्थितीत बघितले. त्यांना नको त्या अवस्थेत बघितल्याने त्यांची तळ पायाची आग मस्तकात गेली. त्यांनी दोघांचाही खून करण्याचा निर्णय घेतला. मात्र ते घरी आले तेव्हा त्यांची मुलगी निलम ही घरात एकटीच होती. त्यानंतर त्यांनी घरातील धारदार सुऱ्याने सर्वप्रथम तिला भोसकले नंतर त्याच सुऱ्याने तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर तिचे ते मुंडके हातात घेऊन तो मझिला पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याला अशा प्रकारे आलेले पाहून पोलिसही हादरले. दरम्यान रस्त्याने मुंडके हातात घेऊन जात असताना अनेकांनी त्याचे व्हिडीओ तयार केले आहेत. सध्या त्याचे हे व्हिडीओ सोसल मिडीया वर व्हायरल झाले आहे.