नागपूरमधील लॉजवर कोषागार सहसंचालकाचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह.

47

नागपूरमधील लॉजवर कोषागार सहसंचालकाचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह.

राजेश श्रीवास्तव छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालक 
1 मार्चपासून होते बेपत्ता.
 The body of the Joint Director of the Treasury was found in a suspicious condition at a lodge in Nagpur.

The body of the Joint Director of the Treasury was found in a suspicious condition at a lodge in Nagpur.

✒युवराज मेश्राम, नागपुर प्रतिनिधी✒

नागपूर:- कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह सीताबर्डी भागातील लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. या घटनेने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राजेश श्रीवास्तव छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालकपदी कार्यरत असलेले 1 मार्चपासून बेपत्ता होते. नागपूरमधील लॉजवर राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एक मार्चपासून पोलीस राजेश श्रीवास्तव यांचा शोध घेत होते. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकित असल्यामुळे राजेश श्रीवास्तव व्यथित असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

राजेश श्रीवास्तव यांच्याशी 1 मार्चपासून संपर्क होऊ शकत नव्हता. नागूपरमधील सीताबर्डी भागातील लॉजमध्ये 104 क्रमांकाच्या खोलीत ते राहत होते. त्यांनी बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ते बेडवर मृतावस्थेत आढळले. लॉज मालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, श्रीवास्तव वास्तव यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.