Selection of wrestlers from Bramhapuri for Maharashtra Kesari Wrestling Competition.
Selection of wrestlers from Bramhapuri for Maharashtra Kesari Wrestling Competition.

ब्रम्हपुरीतील पैलवानांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे करीता निवड.

Selection of wrestlers from Bramhapuri for Maharashtra Kesari Wrestling Competition.
Selection of wrestlers from Bramhapuri for Maharashtra Kesari Wrestling Competition.

अमोल माकोडे, ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपुरी:- नुकत्याच एस .पी कॉलेज चंद्रपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने covid 19 च्या नियमांचे पालन करून जिल्हा निवड चाचणी स्पर्धा सब ज्युनियर- मूल व मुली, महिला गट, वरिष्ठ पुरुष गट गादी व माती विभाग, महाराष्ट्र केसरी खुल्या गट ब्रम्हपुरी तालुका कुस्तीगीर संघानी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत यश प्राप्त केले. विजयी कुस्तीगीरांचे बालेवाडी स्टेडियम पुणे येथे होणाऱ्या 65 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.

सदर निवड महाराष्ट्र केसरी गादी विभाग पै विनय दिवटे 70 किलो ,पै मयुर चोले 79 किलो ,माती- विभाग पै चेतन दिवटे 65 किल़ो, कुस्ती स्पर्धेत आकर्षण असल्येल्या महाराष्ट्र केसरी गट 86-125 किलो पै अमोल अशोक ठेंगरी व पै विनीत पंडित मेश्राम ह्या दोन्ही मल्लांनी दोन्ही गटावर ताबा ठेवत, बाजी मारत चंद्रपूर संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

सब ज्युनियर महिला गटात पै .कु स्नेहा प्रभाकर पाल 65 किलो ,पै .कु नंदीनी राजू थापा 73 किलो ,वरिष्ठ महिला गट -पै .कु भुवनेश्वरी विकास बनपुरकर 50 किलो, पै .कु सुचिता रविंद्र ठेंगरी 55 किलो ,पै .कु तनु मुकेश जाधव 57 किलो ,पै .कु कविता राजिराम घोरमोडे 72 कीलो, पै .कु रोशनी मारोतराव निनावे 76‌‌किलो.  या सर्व पैलवानांचे मार्गदर्शक प्रशिक्षक श्री विनोद नामदेव दिवटे कुस्ती कोच हे ,कुस्ती आखाडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल ब्रम्हपुरी येथे नियमित सराव घेत असतात. सर्व पैलवानांचे व प्रशिक्षकांचे स्वागतकौतुक करीत विलासभाऊ विखार बांधकाम सभापती न.प.ब्रम्हपुरी, दिपकजी उराडे उद्योगपती,  प्रितेश येरमे तलाठी, मोंन्टु पिलारे सामाजिक कार्यकर्ते, नितीन आंबोरकर, कृपाल मेश्राम, राजू आमले, अनीलजी नाकडे, प्रभाकर पाल माजी सैनिक, पै प्रशांत अलोणे, अतुल राऊत, नरेंद्र गाडगीलवार, राजू थापा, क्रीष्णा वैद्य, सौ. मधुमती थापा, सौ.मनीषा पाल इत्यादीनी अभिनंदन केले.

विलास विखार बांधकाम सभापती न प ब्रम्हपुरी यांनी क्रीडा संकुल येथे भव्य कुस्तीचे सभागृह व ग्राउंड उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही देत आपले मार्गदर्शन केलं. मोंन्टु पिलारे समाजसेवक यांनी पैलवानाना घडवण्यासाठी आपन सतत प्रयत्नशिल राहू असे सांगितले. इतर मान्यवरांनी पैलवानांचे मनोबल वाढवुन आपले मोलाचे मार्गदर्शन केले व प्रथम, द्वीतीय व सहभागी पैलवानांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. वरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष माह़ोरे व आभार प्रदर्शन कुस्ती प्रशिक्षक श्री विनोद नामदेवजी दिवटे यांनी केले. सर्व स्तरातून ब्रम्हपुरी तालुक्यातील यशस्वी पैलवानांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here