एन सी सी युनिट,ने. हि. महाविद्यालयच्या 2 कॅडेट्स ची केंद्रीय रिजर्व पोलीस फोर्स’ CRPF करिता निवड.

55

एन सी सी युनिट,ने. हि. महाविद्यालयच्या 2 कॅडेट्स ची केंद्रीय रिजर्व पोलीस फोर्स’ CRPF करिता निवड.

NCC Unit, Ne. Hi. Selection of 2 cadets of the college for Central Reserve Police Force 'CRPF.
NCC Unit, Ne. Hi. Selection of 2 cadets of the college for Central Reserve Police Force ‘CRPF.

अमोल माकोडे ब्रम्हपूरी, तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपुरी:- स्थानिक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, एन सी सी युनिट, ब्रम्हपुरी ( संलग्नित 20 महाराष्ट्र बटालियन एन सी सी, नागपूर) चे 2 कॅडेट्स सिनिअर अंडर ऑफिसर पंकज मांदाडे आणि एक्स-कॅडेट जयश्री नाकाडे ची ‘केंद्रीय रिजर्व पोलीस फोर्स’ CRPF करिता नुकतीच निवड झाली. दोन्ही कॅडेट्स दि 15 मार्च ला पुणे येथे पुढील ट्रेनिंग करिता जात आहेत. महाविद्यालयाच्या दृष्टीने ही निवड अतिशय कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या या यशाबद्दल 20 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमोद चांदना यांनी ट्रेनिंग शिबिरादारम्यान दोन्ही कॅडेट्स चे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

NCC Unit, Ne. Hi. Selection of 2 cadets of the college for Central Reserve Police Force 'CRPF.

त्यांच्या या यशाकरिता ने ही शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया, ने. हि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस कोकोडे, उपप्राचार्य डॉ डी एच गहाने, रिटायर्ड मेजर विनोद नरड, असोसीएट एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट प्रा.अभिजित परकरवार, इन्स्ट्रुक्ट्रर मिथुन चौधरी, संस्थेचे सन्माननीय सदस्यगण, प्राध्यापक वृंद आणि प्रशासकीय कर्मचारी या सर्वांनी या कॅडेट्स चे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.