गॅस दरवाढीचा निषेध म्हणून, जालना जिल्हाचा महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्याची भेट.

52

गॅस दरवाढीचा निषेध म्हणून, जालना जिल्हाचा महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्याची भेट.

As a protest against the gas price hike, women from Jalna district sent a gift to Gowra to Prime Minister Modi.
As a protest against the gas price hike, women from Jalna district sent a gift to Gowra to Prime Minister Modi.

✒गोपीनाथ मोरे प्रतीनिधी✒
जालना दि. 4 मार्च:- सध्या देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिंलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांने आपलं जिवन कस जगाव हा मोठ्या बिकट प्रश्न उभा राहिला आहे. रोज रोज वाढत चाललेल्या या किंमतीमुळे अनेक गरिब परीवाराचे हाल होत आहे. याचाच निषेध करत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता इंधन दरवाढही होत असल्यामुळे सर्वसामान्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांना गोवऱ्या पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

गॅस दरांमध्ये दिवसागणिक होत असलेल्या वाढीचा निषेध म्हणून जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांच्या सूचनेनुसार घनसावंगी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पोस्टाने पाठवण्यात आल्या. या वेळी तालुकाध्यक्षा वंदना पवार, कमल चिमणे, कौशल्या चिमणे, सरस्वती डोरले, रुक्मिणी चिमणे, अयोध्या चिमणे, रुक्मिणी नारायण चिमणे आदी महिलांची उपस्थिती होती.