हिंगणघाट लोन देण्याच्या नावाने बोगस कंपनीने केला करोड़ोंचा फ्रॉड. हजारो लोकांची करोडो रुपयांची लूट.
प्रशांत जगताप/मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट, दि. 5 मार्च:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरांमध्ये व्हिजन ऑफ ग्रुप या कंपनीने अनेक लोकांना पाच लाख लोन करून देण्याच्या नावाने अनेक शेतकरी युवा, बेरोगार आणि हजारो लोकांची करोडो रुपयांची लूट केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. हिंगणघाट पोलिसांनी घटना स्थळी धाड टाकुन आरोपीना केल जेरबंद.
व्हिजन ऑफ ग्रुप नावाच्या कंपनीने आज हिंगणघाट शहरांजवळ असलेल्या नंदोरी रोड लगत एक मोठा लोन मिळावा आयोजित केला होता. त्यात संपुर्ण महाराष्ट्रातुन युवक महिला आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. या बोगस कंपनीने काही महिलांना आणि पुरुषाना कमिशन बेसिक वर प्रचार प्रसारा साठी नेमनुक केली होती. हे कमिशन अजेंड गावागात जाऊन लोकांचे कागदपत्र घेत होते आणि कर्ज मिळणार म्हणून तुम्हाला हिंगणघाट येथील कर्ज मिळाव्यात 5 कर्ज पाहिजे असेल तर 5 हजार 200, 10 लाखांच कर्ज पाहिजे तर 10 हजार 200 रुपये तुम्हाला विमा उतरावा लागेल असे बोलले. यामूळे अनेक लोकांनी 5 आणि 10 हजार विम्याचे जमा केले.

फ्राड कसा आला उघडकीस.
सरोजिनी राजेश कोराडे, आणि स्वप्निल सुरेंद्रजी धनविज यांना व्हिजन ऑफ ग्रुप या बनावटी कंपनीने 5 लाखाचा चेक दिला. तो चेक J TRUST BANK इंडोनेशिया या देशातील बैंकचा होता. या लोकांना यावर थोड़ा संशय आला ते लागेल बैंकत गेले तर हा चेक येथे कैश हौऊ शकत नाही असे बैंक चे कर्मचारी यांना बोलले त्यामुले हे लोक स्थानिक पोलिस स्टेशनला जाऊन त्याचा बरोबर झालेली लूटीची तक्रार दाखल केली.
हिंगणघाट पोलिस विभागाचा समयसुचकते ने आरोपी गजाआड.
व्हिजन ऑफ ग्रुप बनावट कंपनी द्वारा लोकांची सुरु असलेल्या लूटीची माहिती मीळताच हिंगणघाट पोलिस दल घटनास्थळी दाखल झाली आणी आरोपींना अटक केली.