महसूल कोतवाल कर्मचा-यांची शिपाई पदाची पदोउन्नती करावी, वंचित बहूजन आघाडीची मागणी.
वंचित बहूजन आघाडीचे नेते डॉ. उमेश वावरे यांचा नेतुत्वात देण्यात आले निवेदन.
प्रशांत जगताप प्रतीनिधी
हिंगणघाट, दि. 4 मार्च:- वंचित बहूजन आघाडीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांनी वर्धा जिल्हाचे नवीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून निवेदन देण्यात आले.
गावपातळीवर सर्वांत महत्त्वाचा शासकीय कर्मचारी म्हणून महसूल कोतवाल हा नियमित पणे आपली जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडीत असतो. तसेच ज्या तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय येथे शिपाई व वाहन चालकाची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी कोतवाल यांना आदेश केले जातात. व तिथे ही कोतवाल आपली जबाबदारी पार पाडते. इत्यादी सर्व प्रकारच्या शासकीय जबाबदारा पार पाडत असतो. तरी त्या कर्मचा-यांना अजून पर्यंत पदन्नतीपासून वंचित ठेवले. हि शासनासाठी अतीशय लाजीरवाणी बाब असून आपण जातीने लक्ष देऊन कोतवाल कर्मचा-यांना योग्य तो न्याय दयाल. असे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना जिल्हा उपाध्यक्ष राजेश खानकूरे, महादेव शेन्डे, दिलीप कहूरके, मनिष कांबळे, जिवन उरकुडे व वंचित बहूजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.