शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा वंचित बहूजन आघाडीची मागणी.

52

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा वंचित बहूजन आघाडीची मागणी.

वंचित बहूजन आघाडीचे नेते डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन.

Repeal anti-farmer black laws demand of deprived Bahujan Front.
Repeal anti-farmer black laws demand of deprived Bahujan Front.

✒️प्रशांत जगताप प्रतिनिधी✒️
हिंगणघाट, दि. 5 मार्च:- वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष. मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र भर धरणे आंदोलन करण्यात आले असून भारत सरकार दिल्ली यांनी तिन ही कृषी काळे कायदे पारीत केले, ते तिनही काळे कायदे शेतकरी विरोधी असून शेतक-यांची माती मोल करण्याचा प्रयत्न या कायदामुळे होतो आहे. वरील तीन ही कृषी कायदे भारत सरकारने रद्द करावे या करीता आम्हचे शेतकरी मघिल 100 दिवसापासुन दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहे. परंतु भारत सरकार हे आंदोलनांवर हेतु पुरस्पर दुर्लक्षित करीत आहे.

Repeal anti-farmer black laws demand of deprived Bahujan Front.

वंचित बहूजन आघाडी संपूर्ण देशातील शेतक-यांच्या बरोबर संपुर्ण ताकनिशी खंबीर पणे उभी आहे व राहील आपन यांचा तोडगा काढला नाही तर, या देशाला भयंकर परिणाम भोगावे लागतील. अशे निवेदन हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी चन्द्रभान खडाईत यांना वंचित बहूजन आघाडीचे नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निवेदन देते वेळी दिलिपभाऊ कहूरके शहर अध्यक्ष, जिवन उरकुडे, मनिष कांबळे, चारू आटे, व्यंकटेश झाडे, प्रशांत शभरकर, देवेंद्र त्रिपल्लीवार, टिकाराम जवादे, महेन्द्र हाडे, विशाल थुल, मनोहर भगत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.