कोरोनावरील लस घेवून स्वत:ला सुरक्षीत करा’ ज्येष्ठ नागरिकांना जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले यांचे आवाहन.

56

कोरोनावरील लस घेवून स्वत:ला सुरक्षीत कराज्येष्ठ नागरिकांना जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले यांचे आवाहन.

 Protect yourself by getting vaccinated against corona. Appeal by President Sandhya Gurnule.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 5 मार्च :- शासनाने 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक तसेच 60 वर्षावरिल ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण सुरू केले आहे, याअंतर्गत मी देखील जेष्ठ नागरिक म्हणून लस घेतली आहे, तरी आपणही लस घेवून स्वत:ला सुरूक्षीत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती गुरनुले, उपाध्यक्षा रेखा कुऱ्हेकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रीजभूषण पाझारे यांनी आज दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनावरील लस घेतली. यावेळी त्यांचेसमवेत महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, बांधकाम सभापती राजू गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुंडे, समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत उपस्थित होते.

नागरिकांनी लस घेतल्यावरही हात धुणे, अंतर राखणे व नियमित मास्क वापरणे या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्याबाबत श्रीमती गुरनुले यांनी सांगितले.