Vaccination will now be done in 35 places in Wardha district. Citizens should register and get vaccinated.
Vaccination will now be done in 35 places in Wardha district. Citizens should register and get vaccinated.

वर्धा जिल्ह्यात आता 35 ठिकाणी होणार लसीकरण, नागरिकांनी नोंदणी करुन लस घ्यावी.

तिस-या टप्प्यातील लसीकरणाकरीता नागरिकांनी नोंदणी करुन लस घ्यावी. शासकीय व खाजगी रुग्णालयासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश

60 वर्ष वयोगटातील लाभार्थ्याना वैद्यकिय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Vaccination will now be done in 35 places in Wardha district. Citizens should register and get vaccinated.
Vaccination will now be done in 35 places in Wardha district. Citizens should register and get vaccinated.

✒प्रशांत जगताप, प्रतीनिधी✒
वर्धा,दि. 6 मार्च:- जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली असून यामध्ये 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वर्षे वयाचे अति जोखमीच्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या लसीकरण होत असलेल्या 13 रुग्णालयाव्यतिरिक्त सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 3 खाजगी रुग्णालये मिळून एकूण 35 केंद्रावरून लसीकरण करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला 8 मार्च पासून प्रारंभ होत असून आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत विनामूल्य लस दिल्या जाईल.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात कोविड 19 लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड -19 लसीकरीता आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी (वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, आशा, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस) खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांना लसीकरण करण्या आले. दुस-या टप्यात पोलिस, होमगार्ड, महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी , पंचायत राज विभागातील कोविड मोहिमेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

1 मार्च पासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या तिस-या टप्प्यात 45 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयरोग असलेले रुग्ण व 60 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. यामध्ये 45 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना वैद्यकिय अधिकारी यांचे सदर आजार असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र दिल्यानंतर लसीकरण करण्यात येईल. 60 वर्षावरील लाभार्थ्यांना कोणत्याही वैद्यकिय प्रमाणपत्राची गरज नाही.
कोविड प्रतिबंधक लसीचे प्रत्येक लाभार्थ्याने दोन डोस घेणे आवश्यक असून दुसरा डोस पहिल्या डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी घेणे आवश्यक आहे.

लसीकरणाकरीता नोंदणी पध्दती
1 स्वत: रजिस्ट्रेशन
45 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, असलेले लाभार्थी तसेच 60 वर्षावरील सर्व लाभार्थी यांनी स्वत:च्या मोबाईल मध्ये प्लेस्टोअर मधुन कोविन ॲप डाऊन लोड करावा.
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.cowinapp.app
सदर ॲपमध्ये स्वत:ची माहिती भरुन नोंदणी करावी. यामुळे लसीकरण सत्राच्या ठिकाणी रजिस्टे्रशन करण्याची गरज पडनार नाही व वेळेची बचत होईल.

2 लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन
लाभार्थ्याना स्वत: रजिस्ट्रेशन करता आले नाही त्यांना लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन करता येईल. त्याकरीता लाभार्थ्याना आधार कार्ड व मोबाईल नंबर व 45 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयरोग असलेले लार्भार्थींनी वैद्यकिय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

लसीकरण नोंदणी करीता आवश्यक बाबी
1. आधार कार्ड
2. मोबाईल नंबर+++

 

कोविड 19 लसीकरण केंद्र (शासकिय रुग्णालय)
कोविड 19 लसीकरण सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विनामुल्य उपलब्ध आहे.
⊗ 1. जिल्हा रुग्णालय, वर्धा
⊗ 2. कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम
3. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पुलफैल,

⊗ 4. ग्रामिण रुग्णालय, सेलू
 5. ग्रामिण रुग्णालय, देवळी
⊗ 6. ग्रामिण रुग्णालय, पुलगाव
⊗ 7. ग्रामिण रुग्णालय, भिडी
⊗ 8. उपजिल्हा रुग्णालय, आर्वी
⊗ 9. ग्रामिण रुग्णालय, आष्टी
⊗ 10. ग्रामिण रुग्णालय, कारंजा
 11. ग्रामिण रुग्णालय, समुद्रपूर
⊗ 12. उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट

खाजगी रुग्णालय
कोविड 19 लसीकरण शासन मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयामध्ये सशुल्क (रुपये 250 /- ) उपलब्ध आहे.
⊗ 1)आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी (मेघे)
 2)डॉ. राणे हॉस्पीटल, आर्वी
⊗ 3)डॉ. लोढा हॉस्पीटल, हिंगणघाट

20 प्राथमिक आरोग्य केंद्र
आठवडयातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी या तीन दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विनामुल्य दिल्या जाईल.

तालुका प्रा.आरोग्य केंद्र

वर्धा – आंजी, वायफड, सेलू – हमदापूर, झडसी, सिंदी (रेल्वे), दहेगाव(गो), देवळी – गिरोली, विजयगोपाल, नाचनगाव, आर्वी – खंरागना (मो), रोहणा, जळगाव, आष्टी – साहूर, कारंजा – सारवाडी, समुद्रपूर – नंदोरी -मांडगाव -गिरड, हिंगणघाट – अल्लीपुर, कानगावं, बुरकोनी

45 ते 60 वर्ष वयोगटातील उच्चरक्तदाब , मधुमेह , हृदयरोग असलेले लाभार्थी तसेच 60 वर्षावरील सर्व लाभार्थी यांनी 8 मार्च पासुन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here