सांगली शासकीय रुग्णालयाचा अजब कारभार, महिलेच्या ऐवजी दिला पुरुषाचा मृतदेह.

✒ सांगली प्रतिनिधी✒
सांगली, 06 मार्च:- सांगली शासकीय रुग्णालयातुन एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. सांगली शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मयत झालेल्या महिलेची मृतदेह देण्याऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्यात आला.
सांगली येथील सामान्य शासकीय रुग्णालयामध्ये सांगलीच्या आजूबाजुच्या जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी इथे येतात. सदर महिला ही बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरहून उपचारासाठी आली होती. ही महिला वयोवृद्ध असल्याने शासकीय रुग्णालयामध्ये उपचाऱ्यादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईक मृतदेह घेऊन आपल्या गावी निघाल. पण गावाकडे जात असताना अर्ध्या वाटेत गेल्यावर नातेवाईकांच्या लक्षात आलं की, आपल्याबरोबर मृतदेह जो आहे तो आपल्या नातेवाईकांचा नसून तू दुसऱ्या कुणाचा तरी आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांंनी रुग्णवाहिका परत मागे फिरवली. रुग्णालयात मृतदेह परत देण्यासाठी आले असता नातेवाईक आणि रुग्णवाहिका चालकासोबत गाडीच्या भाड्यावरून वादावादी झाल्यामुळे हा प्रकार समोर आला.
नातेवाईकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परत रुग्णालयाला जाऊन वृद्ध महिलेता मृतदेह ताब्यात घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले. आणि हा भोंगळ कारभार समोर आणला. पहाटे 5 वाजता मृतदेह कर्नाटकला नेण्यात येत होता. परंतु, इचलकरंजीमध्ये पोहोचल्यावर हा प्रकार समोर आला.