कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा अंतर्गत जल शक्ती विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजीत.

56

कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा अंतर्गत जल शक्ती विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजीत.

Organized online webinar on water power under Kumbhalkar College of Social Work, Wardha.
Organized online webinar on water power under Kumbhalkar College of Social Work, Wardha.

प्रा. अक्षय पेटकर, प्रतीनिधी✒

वर्धा:- कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा अंतर्गत कार्यरत कृष्णलिला व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तीमत्व विकास केंद्र आणि नेहरू युवा केंद्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात जल शक्ती अभियान अंतर्गत “जल संवर्धन आणि जल सुरक्षेसाठीच्या जल शक्ती” या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

सदर वेबिनार करीता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . चंदू पोपटकर सर उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. मुरलीधर बेलखोडे सर संस्थापक अध्यक्ष निसर्ग सेवा समीती वर्धा व सहा. प्रा. रामेश्वर व्हंडकर हे लाभले होते. तसेच प्रमुख उपस्थित म्हणून नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. शिवधन शर्मा सर होते, सदर वेबिनारचे प्रस्ताविक व आभार सहा. प्रा. राजेश तांडेकर यांनी केले या वेबिनार करीता वर्धा जिल्हयातील मोठया संख्येने तरूनांनी सहभाग घेतला होता . या कार्यक्रमा करीता नेहरू युवा केंद्र वर्धा व महाविद्यालयीन सहकारी वृंध्द तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा सर्वांचे मनःपुर्वक आभार .