जिवतीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय : खासदार बाळू धानोरकर

55

जिवतीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय : खासदार बाळू धानोरकर

 The overall development of life is the goal: MP Balu Dhanorkar

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:- जिल्ह्यातील विकासापासून कोसो दूर असलेला तालुका म्हणून जिवतीची ओळख आहे. जिवतीचा सर्वांगीण विकास करण्याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या आहे. ते जिवती येथील अधिकारी व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, माधव जीवतोड, सुग्रीव गोतावडे, तालुका अध्यक्ष गणपत आडे, पंचायत समिती सभापती अंजना पवार, उपाध्यक्ष नगर पंचायत अशपाक शेख, सीताराम मडावी, रोहित सिगडे, मारोती कुंभरे, आशिष ढसाळे, विलास पवार, किसन राठोड, ताजुद्दीन शेख, माधव डोहींफोडे यांची उपस्थिती होती.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील सर्व जनतेने मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कोरोना पासून बचाव करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील जनतेपर्यंत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पोटतिडकीने काम करीत आहे. या कामी महाविकास आघाडी सरकारच्या सर्व सामान्य जनतेसाठी उपयुक्त योजनांच्या लाभ, घरकुलाचा प्रश्न , लोकाभिमुख सेवा व विकासकामांना गती द्यावी अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.

महावितरण धारकांना कृषी व घरगुती वीज जोडणी न कापण्याची तंबी तसेच वीजवितांचे नवीन धोरण प्रभावीपणे अमलबजावणी करण्याकरिता जनजागृती करण्याच्या सूचना केल्या. त्यासोबतच पट्टे देण्याची प्रक्रिया व विकास कामे वनकायद्यांमुळे थांबली असून हा विषय त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.