जनतेचा अविरत सेवेत रहा : खासदार बाळू धानोरकर

63

जनतेचा अविरत सेवेत रहा : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरात ‘घराघरात मनामनात’ काँग्रेस अभियानाची सुरवात.

Stay in the service of the people: MP Balu Dhanorkar
Stay in the service of the people: MP Balu Dhanorkar

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील जनतेपर्यंत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पोटतिडकीने काम करीत आहे. या कामी महाविकास आघाडी सरकारच्या सर्व सामान्य जनतेसाठी उपयुक्त योजनांचा लाभ, लोकाभिमुख सेवा व विकासकामांच्या प्रचार प्रसार प्रभावी करा तसेच येत्या काळात चंद्रपूर महानगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात येण्याकरिता जनतेचा अविरत सेवेत रहा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगर ‘घराघरात मनामनात’ काँग्रेस अभियानाची सुरवात खासदार बाळू धानोकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर शहराच्या विकासाकरिता येत्या काळात पाच कोटी रुपये खनिज विकास निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, नगरसेवक प्रशांत दानव, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी स्थायी समिती सभापती संतोष लहामंगे, माजी नगरसेवक राजेश अडूर, एन. एस. यु. आय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, विजय चहारे, भालचंद्र दानव, राजू साखरकर, पप्पू सिद्धीकी, राजू वासेकर, मोहन डोंगरे, नौषाद शेख, काशिफ अली, केतन दुरसेलवार यांची उपस्थिती होती.

या अभियानाचा पहिल्या टप्प्यात चंद्रपूर शहरातील चार प्रभागात या अभियानांची सुरवात करण्यात आली त्यात पठाणपुरा येथे युवा काँग्रेस नेते कुणाल चहारे, लालपेठ प्रभागात माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, महाकाली कॉलरी प्रभागात नगरसेविका ललिता रेवलीवार, इंदिरा नगर प्रभागात माजी नगरसेविका सुनीता अग्रवाल यांच्या घरात त्या परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

पुढे महानगर पालिका निवडणुकीत संघटनात्मक व विकासाच्या माध्यमातून संघटन वाढवून ‘घराघरात मनामनात’ काँग्रेस विकासाच्या कामाच्या माध्यमातून नेऊ असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.