Innovative initiative of Smart Village, Mangi (Bu), Women's Health Camp at Smart Village Mangi (Bu).
Innovative initiative of Smart Village, Mangi (Bu), Women's Health Camp at Smart Village Mangi (Bu).

स्मार्ट ग्राम, मंगी (बु) यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम, स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे महिलांचे आरोग्य शिबीर.

मार्गदर्शन तथा मा. संध्याताई गुरनुले, अध्यक्ष, जि.प. चंद्रपूर यांचा नागरी सत्कार संपन्न.

Innovative initiative of Smart Village, Mangi (Bu), Women's Health Camp at Smart Village Mangi (Bu).
Innovative initiative of Smart Village, Mangi (Bu), Women’s Health Camp at Smart Village Mangi (Bu).

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी.

राजुरा:- तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत, मंगी (बु) येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2021 ला स्मार्ट ग्राम पंचायत, मंगी (बु) व ग्रामस्थ महिलांच्या वतीने महिलांचे आरोग्य शिबीर, मार्गदर्शन व मा. संध्याताई गुरनुले, अध्यक्ष, जि. प. चंद्रपूर यांचा नागरी सत्कार संपन झाला. सर्व गावातून लेझीम प्रदर्शनींच्या जयघोषात गावाचे व येथील विविध मंदिराचे दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुर्णकृती पुळयाचे पुजन करुन व पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुले यांचे प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

महिलांचे आरोग्य शिबीर, मार्गदर्शन व नागरी सत्कार कार्यक्रमाचे उदघाटक संध्याताई गुरनुले, अध्यक्ष, जि.प.चंद्रपूर ह्या होत्या तर अध्यक्ष रसिकाताई पेंदोर, सरपंच, मंगी (बु) ह्या होत्या. कार्यक्रमाचे विशेष अतिथी सुनंदाताई डोंगे, सदस्य, पं.स. राजुरा, स्वातीताई देशपांडे,अध्यक्ष, महिला दक्षता समिती, राजुरा, रमाताई गर्ग, अध्यक्ष, जिल्हा महिला फार्मशिस्ट संघ, चंद्रपूर, शालिनीताई ठाकरे, सचिव, जिल्हा महिला फार्मशिस्ट संघ, चंद्रपूर, संगीताताई खान, कोषाध्यक्ष, जिल्हा महिला फार्मशिस्ट संघ,चंद्रपूर, भारतलाई वनकर, उपाध्यक्ष, जिल्हा महिला फार्मशिस्ट संघ,चंद्रपूर, संगीताताई गणपत कोडापे, अध्यक्ष, पेसा समिती, मंगी (बु), जिवनाबाई लखेराव कोटनाके, अध्यक्ष, पेसा समिती, मंगी (खु), विमलताई परशुराम तोडासाम, अध्यक्ष, जैविक विविधता समिती, सोनबत्तीताई मडावी, सदस्य, ग्रा.पं, रुख्माबाई चव्हाण, सदस्य, ग्रा.पं, शिल्पाताई कोडापे, सदस्य, ग्रा.पं, माधुरीताई चनकापुरे, सदस्य, ग्रा.पं, कविता मडावी, अध्यक्ष, क्रांती महिला ग्रामसंघ, कांताबाई सुरपाम, वीर बाबुराव शेडमाके, महिला ग्रामसंघ, सुमनताई येमुलवार, उपाध्यक्ष, शा.व्य.स, लिलाताई सिडाम, सदस्य, शा.व्य.स, जितेंद्रजी बैस, कार्यक्रम प्रमुख, अंबुजा सिमेंट फाउन्डेशन, वासुदेवजी चापले, उपसरपंच , ग्रा.पं. मंगी (बु), परशुरामजी तोडासाम, अध्यक्ष, ग्राम विकास समिती, अंबादासजी जाधव,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गजानन वंजारे, सचिव ग्रा.पं, रत्नाकर भेंडे, मुख्याध्यापक, संभाजी पा. लांडे, जेष्ठ नागरिक, शंकरजी तोडासे, सदस्य, ग्रा.पं, प्रकाशजी वेडमे, अध्यक्ष, तंमुस यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुरामजी तोडासाम, अध्यक्ष, ग्राम विकास समिती यांनी केले . प्रास्ताविकानंतर संध्याताई गुरनुले, अध्यक्ष, जि. प. चंद्रपूर यांचा मंगी (बु) ग्रामवासीयांकडून शाल व श्रीफळ देवून नागरी भव्य सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा महिला फार्मशिस्ट संघ, चंद्रपूर यांचे कडून सुध्दा संध्याताई गुरनुले, अध्यक्ष, जि. प. चंद्रपूर आणि रसिकाताई पेंदोर, सरपंच, मंगी (बु) यांचा शाल, श्रीफळ व मोमेंटो देवून भव्य सत्कार करण्यात आला. सोबतच या कार्यक्रमाला लेझीम पथक उपलब्ध करुन देणारे शिवाजी हायस्कुल राजुराचे मुख्याध्यापक केवलराम डांगे यांचे ग्रामवासीय मंगी ( बु ) यांचे कडून नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर झाडे, शिक्षक तर आभार प्रदर्शन मारोती चापले, शिक्षक यांनी केले. या कार्यक्रमासाठ शाळेतील शिक्षक श्रीनिवास गोरे, पंडीत पोटावी, अंगणवाडी सेविका शारदाताई क्षिरसागर, भिमबाई कन्नाके सरस्वीताई आडे, सुरेखाताई तोडासे तथा गावातील नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, सुरेश येमुलवार, वसंत सोयाम, ज्ञानेश्वर आडे, बिरशाव परचाके, पुंजाराम गेडाम, किसन कोडापे, आबाजी साठोणे यांनी मोलाचे सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here