Woman commits suicide by strangling CDPO in Lakhni, cause of suicide in bouquet.
Woman commits suicide by strangling CDPO in Lakhni, cause of suicide in bouquet.

लाखनी येथील महिला सीडीपीओ यांची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.

 Woman commits suicide by strangling CDPO in Lakhni, cause of suicide in bouquet.

Woman commits suicide by strangling CDPO in Lakhni, cause of suicide in bouquet.

मुकेश चौधरी प्रतीनिधी✒
लाखनी, दि. 6 मार्च :- भंडारा जिल्हातील लाखनी येथील एकात्मिक बाल सेवा प्रकल्पाच्या युवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कुटुंबीय झोपी गेल्यावर भाड्याच्या घरी बाथरूम मधील लाकडी गजाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ता. 6 पहाटे 3.30 वाजता उघडकीस आली. कुमारी शितल अशोक फाळके वय 28 वर्ष रा. पाळडी ता. कोरेगाव जि. सातारा, हल्ली मुक्काम प्रभाग क्र.5 लाखनी असे आहे. या घटनेने महिला व बाल विकास विभागात खळबळ उडाली आहे लाखणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कु. शितल फाळके ह्या एकात्मिक बाल तेव्हा प्रकल्प लाखनी येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून जून 2017 मध्ये रुजू झाल्या. कार्यालयालगत माणिक निखाडे यांचे घरी भाड्याने आईसह वास्तव्यास होत्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त असल्या तरीही मागील काही दिवसापासून त्या तणावग्रस्त होत्या शुक्रवारी ता.5 कार्यालयात त्या नाराज असल्याचे अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रात्री जेवण करून माय लेकींनी रात्री अकरा वाजता दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहिले नंतर झोपण्यासाठी गेल्या. पहाटेच्या सुमारास आई लघु शंकेकरिता बाथरूम मध्ये गेली असता बाथरूम मधील लाकडी गजाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत शितल दिसून आली आईने आरडाओरड केली असता घर मालक व आजू बाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले घटनेची माहिती लाखनी पोलिसांना पोलिसांना दिली.

लगेच पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे सहाय्यक फौजदार विजय हेमने पोलिस नायक उमेश शिवणकर, महिला पोलीस नाईक वासंती बोरकर,पोलीस शिपाई नितीन झंझाड, चालक मंगेश चाचेरे यांच्यासह पोलिस गाडीने घटनास्थळी गेले उपस्थित नागरिकांच्या सहाय्याने प्रेत खाली उतरविले पंचनामा करताना सुसाईड नोट पोलिसांना मिळाल्याची विश्वसनीय वृत्त आहे. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, संख्यांकिकी विस्तार अधिकारी उमेश खाकसे यांनी भेट दिली. लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई मुकेश गायधने करीत आहे. अंत्यसंस्कार मृतकाचे स्वगावी होणार असल्याची माहिती आहे या घटनेने महिला व बाल विकास विभागात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here