ब्रम्हपुरीत दारूचा महापुर, ब्रह्मपुरीत दारूबंदीसाठी म.न.से तालुकाध्यक्ष सुरज शेंडे यांचा एल्गार.

Mahapur of alcohol in Brahmapuri, Elgar of MNS taluka president Suraj Shende for ban on alcohol in Brahmapuri.
✒अमोल माकोडे ब्रम्हपुरी प्रतीनिधी✒
ब्रम्हपुरी, दी.7मार्च:- शहरात कित्तेक ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री केली जाते. महिला व आबालवृद्धांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. स्थानिक प्रशासन शंकास्पद भूमिका घेत असल्याने मनसे तालुकाध्यक्ष सुरज शेंडे यांनी तालुका कार्यकारणीसह उप विभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देतांना, आठ दिवसात अवैध दारू पूर्णता बंद करण्यात यावी अन्यथा म.न.से. ब्रम्हपुरी कार्यकारणी स्वतः अवैध दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणार आणी फौजदारी कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असा इशारा दिला आहे.
1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात तत्कालीन शासनाने सरसकट दारूबंदी केली होती कायदे तयार करून अंमलबजावणी करण्यात येईल व कायदा मोडल्यास कडक कारवाई केल्या जाईल असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र दारूबंदीच्या सहा वर्षात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. दारूबंदी फक्त कागदोपत्री असल्याचे स्पष्ट दिसून येते.
ब्रह्मपुरी तालुक्यातील सिमा भंडारा जिल्हा व नागपूर जिल्हाला लागून असल्याने येथून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक सुरू असते. तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात अर्हेर-नवरगाव,पिंपळगाव पेपर मिल, हळदा,आवडगाव, गांगलवाडी , मुळझा तसेच ब्रह्मपुरी शहरातील मुख्य वरदळ असलेले बस स्थानक समोरील भाग, संत रविदास चौक, टिळक नगर, मालडोंगरी रोड, कुर्झा चौक येथे खुलेआम अवैध दारूविक्री केली जाते आहे.त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी तालुका मनसे च्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मा जिल्हा पोलीस अधीक्षक,पोलीस मुख्यालय, चंद्रपूर. मा विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांना देण्यात आली आहेत.