Aurangabad - Two villages in Wardha district have been adopted by Nam Foundation
Aurangabad - Two villages in Wardha district have been adopted by Nam Foundation

औरंगाबाद – वर्धा जिल्हातील दोन गावे ‘नाम’ फाऊंडेशन कडून दत्तक.

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबाद जिल्हातील धुंदलगाव व वर्धा जिल्हातील आमला ही गावे ‘नाम’ फाऊंडेशन दत्तक घेतल्याचे शुक्रवारी येथे सांगितले.

 Aurangabad - Two villages in Wardha district have been adopted by Nam Foundation

आशीष अंबादे प्रतिनिधी✒
वर्धा,दि.7 मार्च:-  प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबाद जिल्हातील धुंदलगाव व वर्धा जिल्हातील आमला ही गावे ‘नाम’ फाऊंडेशन दत्तक घेतल्याचे शुक्रवारी येथे सांगितले. दुष्काळ निर्मूलन, ग्रामीण विकासाबरोबरच गाव आणि शहरांमध्ये संवाद घडवून आणणार असल्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले. ‘नाम’ फाऊंडेशन बोध चिन्हही तयार केल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेला नागरिकांनी मदत करावी, या उद्देशाने येथील तापडिया नाटय़मंदिरात विविध स्तरातील व्यक्तींनी अक्षरश: रांगा लावून धनादेश व रोख स्वरूपाची रक्कम सुपूर्द केली. फाऊंडेशन कडून एक कोटी झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे अनासपुरे म्हणाले.

वैजापूर तालुक्यातील धुंदलगाव येथे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी ग्रामसभा घेतली. वर्षभर विविध उपक्रम या गावात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. जात-पात, धर्म, पक्ष या पलीकडे जाऊन गावाने विकासाचा मार्ग निवडावा. गावात दारूचा महापूर नसावा आणि गावाला पुढे जाण्याची आस असावी, या निकषावर विदर्भातील आमला व मराठवाडय़ातील धुंदलगाव ही दोन गावे निवडल्याचे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. या फाऊंडेशनकडे आतापयर्ंत 7 कोटी रुपयांचा निधी एकत्रित झाल्याचे त्यांनी सांगितले. लोक सहभागाच्या तत्त्वावर काम उभे करावयाचे असून, त्यासाठी प्रत्येकाने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here