पोलीसाने बंदुकीच्या धाकावर विवाहित महिलेवर बलात्कार, विवाहितेची आत्महत्या, आता महिलेच्या पतीने केली आत्महत्या.

✒ उस्मानाबाद, जिल्हा प्रतीनिधी ✒
उस्मानाबाद :- शहरातील हनुमान चौक भागातील विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यांच्याकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने देखील एक व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालीय. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये पत्नीच्या आत्महत्येस देखील पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यालाच जबाबदार धरले असून, सोबत सासरकडील मंडळी देखील माझ्या जिवावर उठली असल्याचा आरोप त्याने व्हिडीओत केलाय. सदर व्हिडीओमध्ये तो आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्यानंतर महिलेने आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटवरुन समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकर याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कलम 376 अन्वये बलात्कार आणि 306 अन्वये आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकरला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली.
दोन सुसाईड नोट्समध्ये पोलिसाचा उल्लेख
घटनास्थळी दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट सापडल्या आहेत. ज्यात पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट होते. उस्मानाबाद पोलीस दलातील दोन पोलिसांवर गेल्या 15 दिवसात बलात्कार गुन्हा नोंद झाल्याने खाकी वर्दी डागाळली आहे.
पहिली सुसाईड नोट –
मी ………… मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. याला जिम्मेदार हरिभाऊ रामदास कोळेकर असणार आहे. मी फाशी घेणार आहे, त्या कोळेकरच्या घरी कारण त्यानेच माझे वाटोळे केले. त्याने माझा पहिल्यांदा घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला सारखे धमकावत होता, बंदुकीचा धाक दाखवून , यात माझ्या नवऱ्याचा काय दोष नाही
दुसरी सुसाईड नोट –
मी ………………… वय 32 मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. याला जिम्मेदार फक्त हरिभाऊ रामदास कोळेकर आहे. त्याने माझ्यावर घरी येऊन रेप केला व त्याआधारे मला धमकावू लागला , बंदुकीचा धाक दाखवत होता.