जेष्ठांच्या कोरोना लसीकरनासाठी यवतमाळ जिल्ह्यात 50 हजार लस प्राप्त, खासगी रुग्णालयांनाही करणार वितरित  

51

जेष्ठांच्या कोरोना लसीकनासाठी यवतमाळ जिल्ह्यात 50 हजार लस प्राप्त, खासगी रुग्णालयांनाही करणार वितरित  

50,000 vaccines received in Yavatmal district for corona vaccination of seniors, to be distributed to private hospitals

साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी  

यवतमाळ:- जिल्ह्यात जेष्ठांना कोरोना लसीकरण सुरळीत झाले असून जिल्यातील खाजगी रुग्णालयांनाही कोरोना लस वितरित करण्यात येत आहे त्यानुसार जेष्ठ नागरिकांना तेथील केंद्रावरील कोरोना लस घेता येणार आहे. ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्यात 50 हजार कोरोना लस प्राप्त झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 17 खाजगी रुग्णालयांनी कोरोना लसीकरनासाठी तयारी दर्शवली आहे. जिल्ह्यात 50 हजार कोरोना लस प्राप्त झाली आहे. त्यातील काही लस खासगी रुग्णालयातील लसीकर केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोरोना लस देण्याकरिता आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ या आधारे लसिकेद्रांची परवानगी दिली जाते त्यानुसार टप्याटप्याने या रुग्णालयामध्ये लसीकरण सुरु झाले आहे. सध्या 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसेच सहव्याधी (को मॉर्बेडीटी) असणारे 45 वर्षांवरील, नागरिक यांचे लसीकरण होत आहे. शासकीय लसीकरन केंद्रावर ही कोरोना लस विनामूल्य उपलब्ध आहे. परवानगी प्राप्त खासगी लसीकरण केंद्रावर प्रतिलाभार्थी अडीचशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. कोरोना लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतपर्यंत एक हजारऊन अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.