कोरोना रुग्णांच्या मृत्यूने यवतमाळ जिल्हा प्रशासन हतबल.
साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ:- कोरोना संसर्ग सुमारे एक महिण्यापासून मोठया प्रमाणात पसरत चालला असून एकाच कुटुंबातील सर्व इसम पॉझिटिव्ह येत आहे. त्यातच शासकीय आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजना तसेच उपचार पद्धतीत निष्काळजीपणा दिसून येत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्यूचे कारण कारण ठरत आहे.
शनिवार एकंदरीत चार कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर आज पुन्हा तीन इसमांना आपला जीव गमवावा लागला. कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी शहराकडून गाईड लाईन देण्यात आल्या आहे. मात्र या गाईड लाईनचा वापर होत नसल्याने कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी केवळ स्वतः च कडे लक्ष देत असून खाजगी रुग्णालयात उपचार करीत असलेल्या रुग्णांची कोणतीही जिल्हा शल्यचिकित्सकाकडे नाही. त्यामुळे खाजगी रुग्णालयात काय सुरु आहे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकाला फारसे गांभीर्य नाही असे यातून दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात तीन मृत्यूसह 301 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ मध्ये भरती असलेल्या 236जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परीशेदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील 61वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 62वर्षीय पुरुष आणि पुसद येथील 62वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या 301 जनांनमध्ये 186पुरुष आणि 115महिला आहेत. यात यवतमाळातील 100रुग्ण, पुसद 75रुग्ण, दिग्रस 65, दारव्हा10, आर्णी 9, नेर 9, घाटंजी 7,बाबूळगाव 5, कळंब 4, महागाव 4, वणी 4, पांढरकवडा 3, उमरखेड 3, आणि 3इतर शहरातील रुग्ण आहे . रविवारी एकूण 1516 रिपोर्ट प्राप्त झाले यापैकी 301जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 1215जणांचे रिपोर्ट निगिटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1937ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे तसेच आतापर्यन्त एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19274 झाली आहे 24 तासात 236 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16859 आहे तर जिल्ह्यात एकूण 478 मृत्यूची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 172588 पाठविले असून यापैकी 171044 प्राप्त तर 1544 अप्राप्त आहेत तसेच 151770 नागरिकांचे नमुने आतापर्यत निगेटिव्ह आल्याचे जि. प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
(1 उपाययोजना व उपचार पद्धतीत निष्काळजी पणा 478 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती शल्य चिकित्सकाकडे नाही )