राजुरा शहर महिला काँग्रेस अध्यक्षापदी संध्या चांदेकर, शहर कर्याधक्षपदी संगीता मोहुर्ले यांची निवड.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी.
राजुरा:- राजुरा शहर महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आमदार सुभाष धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय येथे पार पडली. यामध्ये नगरसेविका संध्या चंद्रशेखर चांदेकर यांची राजुरा शहर महिला काँग्रेस अध्यक्षापदी तर संगीता मोहुर्ले यांची शहर महिला काँग्रेस कार्याध्यक्षपदी राजुरा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता उपरे यांनी निवड केली.
या प्रसंगी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता उपरे, न प सभापती वज्रमाला बतकामवर, नगरसेविका शारदा टिपले, साधना भाके, दीपा करमणकर, गिता रोहने यासह कृतीका सोनटक्के, निर्मला कुडमेथे, सुमित्रा कुचनकर, शुभांगी खामनकर, अर्चना गर्गेलवार, योगिता मटाले, पूनम गिरसाळवे, पुष्पवर्षा जुलमे, तिलोतामा उमरे, वर्षा वरकडे, सरिता बोर्डे, ज्योती चंदेलकर, सरोजना पठाण, ज्योती शेंडे, माया काशेट्टीवार, सुप्रिया गेडाम, अर्चना देवगडे आदी शहर काँग्रेस कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.