जागतीक महिला दिनी कोल्हापुरात महिलेची बस खाली उडी घेऊन आत्महत्या.

61

जागतीक महिला दिनी कोल्हापुरात महिलेची बस खाली उडी घेऊन आत्महत्या.

 Woman commits suicide by jumping off bus in Kolhapur on International Women's Day.
कोल्हापूर, 8 मार्च:- जागतिक महिला दिनी कोल्हापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने चालत्या बस खाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अजुन पर्यंत आत्महत्या करणारा महिलेची ओळख पटलेली नाही.

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरच्या स्टेशन रोडवरील मलबार हॉटेल समोर ही घटना घडली आहे. हॉटेलसमोरच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कोल्हापूरात 50 ते 55 वयाचा महीलेने आत्महत्या नंतर दु:ख व्यक्त केलं जात आहे. महिलेने आत्महत्या का केली, तिचं कुटुंबा आदी तपास पोलिसांकडून केला जात आहे.