राजुरा येथील महावितरण कंपनीच्या कर्मचा-याला मारहाण.

62

राजुरा येथील महावितरण कंपनीच्या कर्मचा-याला मारहाण.

 Beating of an employee of MSEDCL at Rajura.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी.

राजुरा, दि. 8 मार्च :- येथे काल रात्री 11 वाजता राजुरा येथील उपविभागीय कार्यालयाअंतर्गत शहर विभागातील कार्यरथ कर्मचारी (वरीष्ठ तंत्रज्ञ) संजय लांडे यांच्या घरावर अज्ञात तिन व्यक्तिने घराच्या सामानाची तोडफोड करून, संजय लांडे, व त्याच्या आईला शीविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली, व विट फेकून मारली त्यात लाईनमन त्यांची वृध्द आईला फेकून मारलेली विट लागली.

सदर घडलेल्या घटनेमुळे कर्मचारयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, लाईन स्टाफ कडुन या सदर घटनेचा निषेध नोंदवत असून त्या अज्ञात ईसमावर लवकरात लवकर गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी सर्व कर्मचारी रेटून धरली आहे. अशे कृत्य कर्मचारी सोबत भविष्यात घडणार नाही अशी शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबधित विभागातील अधिकारी यांनी कर्मचारयां सोबत सल्ला मसलत करुन अश्या घटनेला जबाबदार लोकांविषयी कटोरात कठोर कारवाई कशी करता येईल याकडे जातीने लक्ष घालावे, अशी हि मागणी कर्मचारी करीत आहे.

लाईनमन हा समाजातिल असा घटक आहे कि तो रात्र नि दिवस सदर ग्राहका पर्यंत सुरळीत विज कशी पोहचवता येईल या प्रयत्नात असतो, ईतरहि विभागातील कर्मचारया बरोबर महावितरण कर्मचारी यांचे सुधा समाजातिल नागरीकानि आदर करावा, व लाईमनचे कार्य समजुन घेऊन सहकार्य करावे अशी मागणी सुधा महावितरण कंपनीचे कर्मचारी करीत आहेत.