महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महिला सेना व जनहित कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार.
मनोज खोब्रागडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- झोन 2च्या पोलीस उपायुक्त मा. श्रीमती विनिता साहू तसेच भरोसा विभागाच्या पोलीस निरीक्षक मा. श्रीमती वानखेडे यांचा शाल, श्रीफळ व मिठाई देऊन त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सत्कार करण्यात आला.
मनसे महाराष्ट्र सरचिटणीस व महिला सेना अध्यक्षा सौ. रिटाताई गुप्ता तसेच मनसे महाराष्ट्र सरचिटणीस व जनहित कक्षाचे अध्यक्ष ऍड. श्री. किशोर शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात घेतलेल्या कार्यक्रमात ह्याप्रसंगी महिला सेना पदाधिकारी नागपूर उपशहर अध्यक्षा सौ. कल्पना चौहान तसेच जनहित कक्षाच्या पदाधिकारी सौ. सुनीता बोडखे, सौ.दुर्गा शिवणकर , प्रिया वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. भेट व त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान सर्व मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासनं देऊन महिला शक्ती सक्षम व सबल करण्यासाठी योग्य ते कार्यक्रम घेण्यात यावेत असे सुचविले.