MIDC अंधेरी SRA प्रकल्पासह विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात निदर्शने (आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्ष आक्रमक)

52

MIDC अंधेरी SRA प्रकल्पासह विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात निदर्शने (आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्ष आक्रमक)

Demonstrations at Azad Maidan for various demands including MIDC Andheri SRA project (RPI Democratic Party aggressive)
मुंबई दि. 9 (प्रतिनिधी):- रिपब्लिकसन पार्टी ऑफ इंडीया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी संयोजित केलेला निदर्शने कार्यक्रमाचे नेतृत्व कॅप्टन श्रावसण गायकवाड, विजय चव्हाण व हरिभाऊ कांबळे यांनी केलेतर प्रमुख उपस्तिथी म्हणून पक्षप्रमुख कनिष्क कांबळे उपस्तिथ होते, वसंत कांबळे, शिव राठोड, रत्नाकर रणदिवे, प्रभू बनसोडे यांच्या उपस्टिठीत झालेल्या निदर्शने कार्यक्रमात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.

१.शेतकऱ्यां विरोधातील जाचक कायदे रद्द करावेत.
२.SBI बँकांचे खाजगीकरण करू नये.
३.जिथे जिथे खाजगीकरण झाले आहे त्याठिकाणी आरक्षण लागूप करावे.
४.बौद्ध व अनुसूचित जाती जमातींवर टार्गेट करून हल्ले करू नये.
५.मुसलमान आदिवासी वंचित समूहावर जिवीत हल्ले होऊ नये.
६.भारतीय संविधान हा विषय माध्यमिक शालेय शिक्षणात समाविष्ट करावा.
७.संविधानाचा अपमान व पायमल्ली थांबवावी.
८.महिला व मुलींवरील अत्याचार थांबवावेत.
९.EVM र कायमस्वरूपी बंदी आणावी.
१०.जातीवाद संपुष्टात आणण्यासाठी सरकारने प्रामाणिक पाने उपाययोजना आखून अंमलबजावणी करावी.
११.अंधेरी एमआयडीसी परिसरात विकासक व भ्रष्ट अधिकाऱ्यांमार्फत झालेला भ्रष्टाचार तपासून कडक कारवाई करावी मूळ झोपडीधारकाला सदनिकेचा ताबा द्यावा व थकीत भाडे धनादेश देण्यात यावे, घुसखोरांवर कडक कारवाई करावी, विकासक विमल शहा वर 420 कलमानव्ये कारवाई करावी.
१२. पक्षाचे प्रतिनिधी व राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. राजन माकणीकर महासचिव, श्रावण गायकवाड उपाध्यक्ष, यांना व यांच्या परिवाराच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यांना पोलिस संरक्षण द्या.
या व अन्य मागण्यासाठी निदर्शने कारण्यात आली.