Savitribai Phule Memorial Day program held at Shri Saibaba Lok Prabodhan Kala Mahavidyalaya Wadner
Savitribai Phule Memorial Day program held at Shri Saibaba Lok Prabodhan Kala Mahavidyalaya Wadner

श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे सावित्रीबाई फुले स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न.

Savitribai Phule Memorial Day program held at Shri Saibaba Lok Prabodhan Kala Mahavidyalaya Wadner

प्रा. अक्षय पेटकर प्रतीनीधी✒
हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे नुकताच सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेणा लोकप्रबोधन शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. दिवाकर गमे उपस्थित कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. उत्तमराव पारेकर हे होते प्रमुख अतिथी म्हणून मंचावरती अविनाश काकडे आणि गजाननराव अहमदाबादकर आदी मंडळी उपस्थित होती.

कार्यक्रमाचा प्रारंभ हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला .यावेळी मंचावरील वक्त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे चरित्र, कार्य आणि साहित्य यावरती प्रकाश टाकला सोबतच सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे चा आज देशातील स्त्रिया सुशिक्षित होऊन सन्मानाच्या मार्गावरती मार्गक्रमण करीत आहे असे विचार मंचावरील वक्त्यांनी मांडले.शिक्षणामुळे स्त्रियांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात समान वाटा मिळण्यासाठी कशी मदत झाली हे वक्त्यांनी सर्वांसमोर मांडले. या कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभागाचे डॉ. प्रवीण कारंजकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. विनोद मुडे यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील डॉ. विठ्ठल घिनमीने प्रा. संजय दिवेकर प्रा. नितेश तेलहांडे, डॉ. गणेश बहादे प्रा. आरती देशमुख कु. प्रीती सायकर,अरुण तिमांडे संजय पर्वत शंकर राऊत, अंकुश वैद्य सुरेशराव तेलतुंबडे, विजयालक्ष्मी जारोडे पत्रकार सचिन महाजन आदी मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here