चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीवर चाकूने वार,पत्नी गंभीर जखमी
✒पुणे जिल्हा प्रतिनिधी✒
पुणे:- जिल्हातील खेड पुलिस स्टेशन परीसरात पतीने आपल्या पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून चाकूने वार करुन गंभीर केले आहे. या प्रकरणी पती किसन भीमाजी भारमळ वय 55 वर्ष यांच्याविरुद्ध पत्नीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार नंदा किसन भारमळ वय 43 वर्ष व पती किसन भारमळ वय 55 वर्ष हे वाडा रोड येथील गोळी कारखाना येथे शिव कदम बीबी यांच्या चाळीत राहत होते. पत्नी नंदा भारमळ या मोलमजुरीचे काम करतात. पती किसन भारमळ हा संगम गार्डन सोसायटीचे सिक्युरिटी काम करत होता. सोमवारी दि.8 सोमवारी दुपारला 2 वाजताच्या सुमारास पती किसन भारमळ घरी आला होता. दरम्यान नंदा यांच्या नातेवाईक दीपाली भोईटे घरी आल्या होत्या. घरात आलेली मुलगी कोण आहे, असे पतीने विचारले असता पत्नीने पतीला येथून निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून पती किसन यांने नंदा यांच्यावर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केला. या नंतर तो फरार झाला. या घटनेबाबत पोलिसांनी आरोपी किसन भारमळ याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडी दिली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गादर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड करत आहे.