कळमेश्वर पोलीस स्टेशन डायरी वरील धक्कादायक प्रकार, कळमेश्वर पोलीसांना फोनवर माहिती देणे ठरतोय गुन्हाच.

✒नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर, दि. 11 मार्च:- पोलीस स्टेशनला एखाघ्या गुन्ह्याबाबतची फोनवर माहीती देने म्हणजे सर्वसामान्यांसाठी गुन्हाच ठरते असून अनेकांवर नामुश्कीची वेळ येत आहे. तर गुन्हेगारांना यामुळे मोकळे रानच मिळते आहे. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत, परंतु सघ्यास्थितीत कळमेश्वर पोलीसात मात्र या उलट होताना दिसून येत आहे.
सोमवार दिनांक 8 रोजी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी पोलीस स्टेशन येथील स्टेशन डायरी वरील 07118 271 227 या फोन क्रमांकावर एका मानवाईक ग्रुहस्ताने पोलीसांना माहिती सांगितली कि पोलीस स्टेशन मागे अवघ्या दोनशे मीटरवर हुडको कॉलनी केटीएम हॉल मागे एक लग्न रिसेपशन (स्वागतसमारंभ)चा कार्यक्रम चालू असून मोठ्या व कर्कश आवाजात डिजे चालू असल्याची माहिती दिली. त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांने म्हटले की आपले नाव व आपला पत्ता व मोबाईल नंबर द्या, यावर त्या गृहस्थाने म्हटले की एखाद्या गुन्ह्याबाबत माहिती देणे गुन्हा आहे का ? त्यावर कार्यरत कर्मचार्याने पहीले तुमची सर्व माहिती द्या नंतरच कारवाई करु असा दम देण्यात आला. स्थानीय पोलीस अकार्यक्षमता दाखवत असल्याने गुहस्थाने मी आता एसपी साहेबांना सांगतो तर पोलिस कर्मचारी म्हणाला की एसपी साहेबांची धमकी कोणाला देता. हे घ्या माझे नाव आणि सांगा एसपी ला तसेच तुम्ही तुमचा पत्ता द्या मी तुमच्या घरी येतो. तुम्ही ब्राह्मणी फाट्यावर असाल तर मी तिथे येतो अशा प्रकारे उद्धटपणे पोलीसी धाक दाखवीत फोन बंद केला. त्यानंतर त्या गृहस्थाने अजून रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी फोन करून सांगितले की अजूनही डीजे चालूच आहे साहेब कारवाई करां. असे म्हटले असता, तर मघाशी फोन करणारे तुम्हीच आहे ना रात्री दोन कर्मचारी असतात व एक गाडी असते आता ती गाडी बाहेर गेली आहे रात्री वेळी अधिकारी नसतात ते सकाळी ड्युटी करून चालले जातात तुमचे पहिले नाव सांगा व मोबाईल नंबर पत्ता द्या असे म्हणत तुमचा फोन रेकॉर्ड होत आहे हे तुम्ही विसरू नका मी आताच मुंबई वरून आलो मला येथील काही माहिती नाही असा दम देत गुहस्थावर चिडत म्हणाला. त्यावर त्या गृहस्थाने उद्या येतो असे म्हटले असतात दहा पंधरा जणांना मला पाहायला घेऊन या तुमचा चेहरा पाहायला मिळेल असे या कर्मचाऱ्यांनी त्या गृहस्थाला धमकावले.
जर कुठे एखादी घटना घडत असेल किंवा अवैध धंद्याबाबत माहिती व तक्रार नागरिकांना द्यायची असल्यास उलट नागरिकांचे नाव पत्ता फोन नंबर मागणे व त्या अवैध धंदे करणाऱ्या ला सांगणे की तुझी तक्रार या व्यक्तीने केली अाहे त्याला बघून घे, असे सांगत अवैद्य गुन्हेगारांना पूर्वसूचना देणे नाही का तसेच अशा प्रकारचे प्रकार नेहमी रात्रीच्या वेळी होत असतात म्हणून अनेक नागरिकांना अवैध धंद्याची व गुन्ह्याची अपघाताची माहिती असते परंतु पोलिसांच्या या भूमिकेमुळे कोणीही फोन करण्यास समोर येत व गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते आहे ही विशेष .
कोरोना काळात लग्न समारंभ घरीच 50 लोकात करायचा असल्याचा शासन निर्णय असताना,डीजे ची परवानगी आहे का तसेच तो रात्री दहानंतरही चालू देण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे का असा प्रश्न नागरिक करत असून जिल्ह्यात प्रतिबंधने घातली आहे परंतु सर्रासपणे नियमच तोडली जात असून नागरिकांनी सांगितले की उलट तपास त्याच नागरिकांचा होतो त्यामुळे कोरोणा संक्रमण आपण अशा पद्धतीने पद्धतीने थांबू का हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
“कळमेश्वर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमानात अवैध धंधांंनी लाखोंची उड्डाने घेतली असून पोलीसांच्या चीरीमीरीच्या खेळात अनेकांचे संसार धूळीस मिळालेले बघायला मिळते आहे.यामुळे अधिकार्यांचा कर्मचार्यांवरीलच असलेला वचक पार खालावल्याचे दिसून येत आहे.”