On International Women's Day, two women were felicitated at Smart Village, Mangi (Bu).
On International Women's Day, two women were felicitated at Smart Village, Mangi (Bu).

स्मार्ट ग्राम, मंगी (बु) येथे जागतिक महिला दिनी दोन महिलांना साडी चोळी देवून सत्कार सोहळा उत्सहात संपन्न.

 On International Women's Day, two women were felicitated at Smart Village, Mangi (Bu).

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी.

राजुरा:- तालुक्यातील मंगी (बु) येथे दिनांक 8 मार्च 2021 ला स्मार्ट ग्राम पंचायत , मंगी (बु) व जि. प.उच्च प्राथमिक शाळा, मंगी (बु) यांचे संयुक्त विद्यमाने ” जागतिक महिला दिन ” साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून शालेय पोषण आहार अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी अनुसयाबाई कुळसंगे आणि मदतनिस फुलाबाई सिडाम यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल साडी व चोळी देवून नागरी सत्कार करण्यात आला. सत्कारामुळे सत्कार मुर्ती ताई भारवून गेल्या. या गावातील व जिल्हयातील ही पहिलीच घटना असेल की अशा पध्दतीने सत्कार होतो आहे. गावानी त्यांच्या स्वच्छता विषयक कामाची दखल घेवून सत्कार केला. गावात एक आनंददायी वातावरण तयार झाले. ग्राम पंचायत, मंगी (बु) नेहमीच कर्तबगार व्यक्तीची दखल घेत असते. गावात चेतनामय वातावरण निर्माण झाले. जि.प.शाळेच्या प्रांगणात मुख्य सोहळा पार पडला.

सर्व प्रथम माँ जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रसिकाताई पेंदोर, सरपंच, ग्राम पंचायत, मंगी (बु) हे होते तर अंबादासजी जाधव, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वासुदेवजी चापले, उपसरपंच, ग्रा.पं, परशुरामजी तोडासाम, अध्यक्ष, ग्राम विकास समिती, सुमनताई येमुलवार, उपाध्यक्ष, शा.व्य.स, संगीताताई गणपत कोडापे, अध्यक्ष, पेसा समिती, मंगी (बु), विमलताई परशुराम तोडासाम, अध्यक्ष, जैविक विविधता समिती, सोनबत्तीताई मडावी, सदस्य ग्रा.पं, रुखमाबाई चव्हाण, सदस्य ग्रा.पं, शिल्पाताई कोडापे, सदस्य ग्रा.पं, कविताताई मडावी, अध्यक्ष, क्रांती महिला ग्रामसंघ, लिलाताई सिडाम, सदस्य,शा.व्य.स, सुमनताई रोहणे, सदस्य शा.व्य.स, शेवंताताई चव्हाण, सदस्य, शा.व्य.स, संभाजी पा. लांडे, ज्येष्ठ नागरिक, गजानन वंजारे, सचिव ग्रा.पं, रत्नाकर भेंडे, मुख्याध्यापक, जि.प.शाळा, शंकर तोडासे, सदस्य ग्रा.पं., जयाताई माहितकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मारोती चापले, शिक्षक तर आभार प्रदर्शन पंडीत पोटावी, शिक्षक यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्रीनिवास गोरे, अंगणवाडी सेविका शारदाताई क्षिरसागर, भिमबाई कन्नाके सरस्वतीताई आडे तथा गावातील नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, सुरेश येमुलवार, वसंता सोयाम, मंदाताई मत्ते आशा वर्कर यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here