समाज कल्याण विभागाच्या योजनांची चित्ररथाव्दारे प्रसिध्दी.

53

समाज कल्याण विभागाच्या योजनांची चित्ररथाव्दारे प्रसिध्दी.

Publicity of schemes of social welfare department through pictures.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- कोरोना जनगाजगृती चित्ररथासोबतच आज समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या योजनांचा चित्ररथ देखील जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रचार व प्रसिध्दीसाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आला.

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती अनुसूचित जाती व नवबौध्द घटातील लोकांपर्यंत पोहचविणे हे या जनजागृती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये चित्ररथाद्वारे ही मोहीम राबविण्यात येत आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, सोबत सामाजिक न्याय विभागाच्या विशेष अर्थसहाय्य योजना जसे-कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना, रमाई घरकुल योजना तसेच इतर योजनांची माहिती जिल्ह्यातील ग्रामीण भागात देवून जनमाणसात विस्तृत जनजागृती करण्यात येणार आहे.