Health camps and cultural programs for women prisoners in Chandrapur District Jail.
Health camps and cultural programs for women prisoners in Chandrapur District Jail.

चंद्रपूर जिल्हा कारागृहातील महिला बंदी करिता आरोग्य शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम.

जागतिक महिला दिनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा उपक्रम

Health camps and cultural programs for women prisoners in Chandrapur District Jail.
Health camps and cultural programs for women prisoners in .

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 10 मार्च :- चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-1 येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांचे वतीने महिला बंदींकरिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून न्या.जाधव सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये कारागृहाचे प्रभारी अधीक्षक वैभव आत्राम, अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.सपना बिरेवार, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगेवार, अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्या डॉ.भारती दुधानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या संध्या तोगर, तुरुंग शिक्षक ललित मुंडे उपस्थित होते.

कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगेवार यांनी कार्यक्रमाचे स्वरुप महिला बंदीवांनाना समजावून सांगीतले. तद्नंतर कारागृहाचे प्रभारी अधीक्षक वैभव आत्राम यांनी सर्व महिला बंदी यांना जागतिक महिला दिनाचे शुभेच्छा दिल्या व सर्व महिला बंदी व महिला कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याबाबत सांगीतले. अध्यक्षीय भाषणामध्ये. न्या.जाधव,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी महिला बंदी भगिनी यांना जागतिक महिला दिनाचे शुभेच्छा देत सर्व महिलांमध्ये दया, करुणा, ममता हे उपजत दैवी गुण असल्याने पुरुषांचे तुलनेत त्यांचे अपराधामध्ये प्रमाण अत्यल्प असल्याचे प्रतिपादन केले तसेच सर्व महिला बंद्यानी समाजात परत गेल्यावर कधीही पुन्हा अपराधी कृत्य करु नये असे आव्हान केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना बिरेवार यांनी महिला बंद्याची आरोग्य तपासणी केली. यावेळी अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्या डॉ.भारती दुधानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर च्या पी.एल.व्ही संध्या तोगर यांनी प्रत्येक महिला बंद्याना साडी व शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले.

कार्यक्रमाचे संचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सुभेदार देवाजी फलके, रुपाली राठोड, उषा शाहू, हर्षा सिरिया, माधुरी नन्नावरे, पुजा कांबळे, रुपाली घोरपडे, प्रिया नारनवरे इत्यादीं महिला कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here