Candidate's agitation due to postponement of MPSC examination.
Candidate's agitation due to postponement of MPSC examination.
MPSC परिक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे इच्छुक उमेदवाराचे आंदोलन.

Candidate's agitation due to postponement of MPSC examination.

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रातिनिधि✒
यवतमाळ,दि.11मार्च:- रविवार, 14 मार्च 2020 रोजी होणारी एमपीएससीची राज्य सेवा परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलीय.. राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या कोरोना निर्बंधविषयक शिफारशींनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, यवतमाळ मध्ये आज परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आंदोलन छेडलं. यवतमाळच्या संविधान चौकात रस्त्यावर उतरत ठाकरे सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी देत सरकारचा निषेध केला.
एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा जरा विचार करा आणि परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here