महाशिवरात्रीच्या दिवशी कुटुंबियासह देवदर्शनासाठी गेलेल्या तरुनाचा नदीपात्रात बुडून मृत्यू.

54

महाशिवरात्रीच्या दिवशी कुटुंबियासह देवदर्शनासाठी गेलेल्या तरुनाचा नदीपात्रात बुडून मृत्यू.

 A young man who went for Devdarshan with his family on the day of Mahashivaratri drowned in a river basin.

✒मनोज खोब्रागडे चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी✒
चंद्रपूर:- जिल्हातील गोंडपिपरी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या कुटुंबियां बरोबर देव दशर्नासाठी गेलेल्या दहावीत शिकणा-या एकुलत्या एक मुलाचा नदीपात्रातील पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रोहित जनार्धन देठे वय 16 वर्ष असे नदीत बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या निमित्त देठे कुटुंब आणि इतर महिला हे नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गोंडपिपरी येथील दहा महिला व दोन मूल ऑटोने येनबोथला येथील वैनगंगा नदीवरील मंदिरात गेले होते. दर्शन घेऊन त्यांनी आंघोळ केली. त्यानंतर सर्व महिला मंदिर परिसरात बोलत बसल्या होत्या. त्यावेळी रोहित देठे व शिवम माकोडे वय 11 हे नदीपात्राच्या पारीवर फिरत होते. त्यावेळी अचानक रोहितचा पाय घसरला अन् तो नदीपात्रात बुडाला. तो बाहेर येत नसल्याचे पाहून शिवमने नदीपात्रात उडी घेतली. पण पात्र खोल असल्याने तो बुडू लागला. त्यावेळी त्याने मदतीसाठी हाक दिली. एवढ्यात येनबोथला येथील चौघांनी नदीपात्रात उडी घेत शिवम व रोहितला बाहेर काढले. त्यावेळी रोहीत हा बेशुध्द होता. रोहितला गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दयी घटनेमूळे परीसरात सर्वत्र हयगय व्यक्त करण्यात येत आहे.