Home latest News कोरोनाच्या सावट खाली, MPSC परीक्षेची नविन तारीख जाहीर.

कोरोनाच्या सावट खाली, MPSC परीक्षेची नविन तारीख जाहीर.

5
0
Under the auspices of Corona, MPSC announces new date for exams
Under the auspices of Corona, MPSC announces new date for exams

कोरोनाच्या सावट खाली, MPSC परीक्षेची नविन तारीख जाहीर.

21 मार्च 2021 ला होणार परिक्षा.

 Under the auspices of Corona, MPSC announces new date for exams

✒साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी✒
यवतमाळ,दि.12 मार्च:- महाराष्ट्र राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. 

Candidate's agitation due to postponement of MPSC examination.

राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने राज्यातील  शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

यवतमाळ मध्ये काल परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आंदोलन छेडलं. यवतमाळच्या संविधान चौकात रस्त्यावर उतरत ठाकरे सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी देत सरकारचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here