विदर्भात कोरोना वायरसचा मोठ्या प्रसार. 11 जिल्ह्यांमध्ये पाच दिवसात 17 हजार 771 कोरोना बाधित रुग्णांची नोंद.
✒️प्रशांत जगताप कार्यकारी संपादक✒️
नागपुर,दि.12 मार्च:- संपुर्ण महाराष्ट्र राज्यभर कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पहिल्या लाटेट तुलनेने विदर्भात रुग्णसंख्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा कमी होती. मात्र दुसऱ्या कोरोना लाटेत विदर्भात कोरोनाच प्रसार झपाट्याने होताना दिसत आहेत.
विदर्भात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसात विदर्भात 11 हजार 771 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागपुरात सर्वाधिक 6193 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे.
विदर्भात मागील पाच दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
नागपूर
पाच दिवसात 6193 कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण आढळले. या कालावधीत 46 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
अमरावती
मागील पाच दिवसात 2869 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुलढाणा
मागील पाच दिवसात 3045 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अकोला
मागील पाच दिवसात 1732 कोरोना रुग्ण आढळले असून 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
चंद्रपुर
पाच दिवसात 1184 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वर्धा
मागील पाच दिवसात 931 रुग्ण आढळले असून 15 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
यवतमाळ
मागील पाच दिवसात 437 रुग्ण आढळले असून एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वाशिम
मागील पाच दिवसात 998 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गडचिरोली
मागील पाच दिवसात 88 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
गोंदिया
मागील पाच दिवसात 90 रुग्ण आढळले असून एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भंडारा
मागील पाच दिवसात 204 रुग्ण आढळले आहेत.