When Kirnotsav is held on the statue of Buddha in the cave at Verul.
When Kirnotsav is held on the statue of Buddha in the cave at Verul.

जेव्हा वेरूळ येथील लेणीतील बुद्धाचा मुर्ति वर किरणोत्सव होतो..

When Kirnotsav is held on the statue of Buddha in the cave at Verul.

वेरूळ, दि.12 मार्च:- औरंगाबाद जिल्हातील जगप्रसिद्ध वेरुळ येथे आज पर्यटक यांनी एक वेगळाच अनुभव आला. आपण किरणोत्सव अनेकदा पाहिला असेल, अनुभवला असेल. सूर्याची मावळतीची किरणे खोल गाभाऱ्यात असलेल्या मूर्तीवरील चेहऱ्यांना कशी उजळवतात, ते पहाणे खरोखरच रंजक आणि रोमांचित करणारा अनुभव असतो.

अशाच प्रकारचा किरणोत्सव ऐतिहासिक व जगप्रसिद्ध पर्यटन असलेल्या वेरूळ येथील दहा नंबरच्या लेण्यातील बुद्ध मूर्तीवर अनुभवायला मिळाला. हा क्षण अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दीही झाली होती. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणात जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती बुधवारी आली.

गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधीवृक्षाखाली (पिंपळ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी मंगल प्रवचना साठी बोलविण्याची प्रथा होती.

आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल. गेली अनेक वर्षे अनेक पर्यटक केवळ हा किरणोत्सव अनुभवण्यासाठी या विशिष्ट काळात वेरूळला भेट देतात, हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here