वर्धा कुख्यात गुन्हेगार राकेश मुन्ना पांडे याला रिव्हॉल्व्हर सह अटक

44

वर्धा कुख्यात गुन्हेगार राकेश मुन्ना पांडे याला रिव्हॉल्व्हर सह अटक
Wardha notorious criminal Rakesh Munna Pandey arrested with revolver

✒ आशीष अंबादे प्रतिनिधि ✒
वर्धा, दि.12 मार्च :- जिल्ह्यातून पोलिसांनी हद्दपार केल्यानंतरही वर्धेत आलेल्या कुख्यात गुंड राकेश पांडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देशी बनावटीच्या रिव्हावलरसह अटक केली.  पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हने यांचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पोउपनि ढोले हे पथकासह वर्धा शहरात गस्तीवर असताना जिल्ह्यातील हद्दपार राकेश मुन्ना पांडे हा वर्धा जिल्हयातुन हद्दपार असुन तो त्याचे राहते घरी आला आहे व त्याचे जवळ अग्निशस्त्र आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. त्यावरून त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता पोलीस दिसताच तो पल्सर गाडीने पळून जात असताना आरोपी याला विसावा चौकातून ताब्यात घेतले. त्याचेकडुन एक देशी बनावटीचे लोखंडी रिव्हॉल्व्हर मॅग्झीन नसलेली, 3 मोबाईल, एक जुनी बजाज प्लसर असा 1,07,700 रुपयांचा माल जप्त करून आरोपीने हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपीस पो स्टे.वर्धा शहर यांचे स्वाधीन करण्यात आले.

ही कारवाही पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधिक्षक यशवंत सोळुके यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात सपोनि महेंद्र इंगळे, पोउपनि गोपाल ढोले, पोलीस अंमलदार नरेंद्र डहाके, गजानन लामसे, प्रमोद पीसे, सचिन खैरकार, राम ईप्पर, राजेद्र जैसिंगपुरे, मनिष काबळे, गोपाल बावनकर, नवनाथ मुढे यांनी केली