शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयासाठी विद्युत जनरेटर खरेदीच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार

49

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयासाठी विद्युत जनरेटर खरेदीच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार

Approve the proposal for purchase of power generator for Government Medical College and Hospital - b. Sudhir Mungantiwar

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे विद्युत जनरेटर खरेदीच्‍या प्रस्‍तावाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांच्‍याकडे केली आहे.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय ही अतिशय महत्‍वाची आरोग्‍य संस्‍था असून वैद्यकिय शिक्षणाचे प्रशस्‍त दालन आहे. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्‍हयातील रूग्‍ण याठिकाणी उपचारार्थ येत असतात. या महाविद्यालय व रूग्‍णालयासाठी 40 लाख रू. किंमतीचा विद्युत जनरेटर खरेदीचा प्रस्‍ताव महाविद्यालय प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे व शासनाकडे मंजूरीसाठी सादर केला आहे. या प्रस्‍तावाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांसह सचिव वैद्यकीय शिक्षण व संचालक वैद्यकिय शिक्षण यांच्‍याकडे केली आहे.