ॲड.एकनाथराव साळवे यांच्या निधनाने सच्चा शिक्षक, उत्तम वकील आणि प्रामाणिक राजकारणी हरपला : ना. विजय वडेट्टीवार

64

ॲड.एकनाथराव साळवे यांच्या निधनाने सच्चा शिक्षक, उत्तम वकील आणि प्रामाणिक राजकारणी हरपला : ना. विजय वडेट्टीवार

Dhyayavadi social worker lost - Aa. Sudhir Mungantiwar

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि.13 मार्च:- काँग्रेसचे जेष्ठ नेते, पक्षविरहीत प्रामाणिक राजकारणी, आयुष्याची सुरुवातच शिक्षकी पैशातून करणारे सच्चा शिक्षक, उत्तम वकील तसेच समता, बंधुता स्वातंत्र्य या तत्वाचा पाईक असलेला आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ अनुयायी माजी आमदार ॲड. एकनाथराव साळवे आज आपल्यातून निघून गेले, ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही अशा शब्दात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या .

राष्ट्रपिता महात्म्या गांधी यांच्या विचारावर त्यांची अप्पार श्रध्दा होती. मतभेद बाजूला सारून नेहमीच सर्व पक्षातील कार्यकर्त्यावर, नेत्यावर मित्रत्वाची भावना जोपासली व त्या माध्यमातून माणसे जोडण्याची किमया साधली. त्यामुळेच ते चंद्रपूर शहरात काँग्रेसचे दोन वेळा आमदार होते. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे वडेट्टीवार