अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या चंद्रपूर युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप गेडामची निवड.
विदर्भ सचिव महिपाल मडावी यांनी दिल्या शुभेच्छा
प्रदिप गेडाम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी विसापूर चे प्रदीप गेडाम यांची निवड झाली. श्री. गेडाम यांचे नेतृत्व समाजाला दिशा देणारे असून जिल्यात फार मोठा युवकांचा संघटन करून जागृती निर्माण करण्या चा काम गेडाम करीत आहेत.
तसेच उच्च शिक्षीत,संयमी व अन्याया विरूद्ध बंड पुकरणारे युवा नेतृत्व प्रदीप गेडाम यांच्या रूपाने पुढे आले असून जाती पतीच्या पलीकडे जाऊन गोर गरिबांना मदत करीत असतात.
गेडाम यांनी आदिवासी, व अनुसूचित जातीतील गरजूंना घरकुल दिल्या जाते त्याच धर्तीवर ओबिसिना घरकुल दिल्या जात नाही ओबीसींचा घरकुकाचा लक्षांक अत्यंत कमी असून हा दूजाभाव शासन करू नये यासाठी त्यांचा लढा सुरू आहे.
तसेच आदिवासींच्या विविध योजना, शेती सुधारणेच्या योजना आदिवासी पर्यंत पोहचाव्या, विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळवा, शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सातत्याने ते प्रयत्न करीत आहेत. असे बहु आयामी नेतृत्व जिल्ह्याला मिळाले असून त्यांच्या कार्याची दखल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनी घेतली असून प्रदीप गेडाम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा युवा विदर्भ सचिव महिपाल मडावी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन सिडाम यांनी दिल्या आहेत.