लग्नसमारंभात 200 लोकांची परवानगी द्यावी, खा. रामदासजी तडस यांना निवेदन देण्यात आले.
मंगल कार्यालय,लॉन डेकोरेशन,साऊंड, कॅटरिंग, बिछायत केंद्र याचावरील निर्बंध हटवा व 50 लोकांची परवानगी व आर.टी.पी.सी. आर ला स्थगिती देऊन लग्नसमारंभात 200 लोकांची परवानगी द्यावी.
✒प्रा. अक्षय पेटकर प्रतीनिधी✒
हिंगणघाट :- जिल्ह्यातील मंगल कार्यालय, सभागृह, डेकोरेशन, साऊंड, बीछायत केंद्र, जिम मालक, व्यापारी वर्ग वर्षभरापासून संपूर्ण व्यवसाय ठप्प होते आता कसं बिस सुरू झालं त्यात प्रशासनाने या व्यावसायीक धारकांना कोरोणा चाचनी अनिवार्य केली आहे यावरील निर्बंध हटवण्यासाठी आज दी. १२-मार्च २०२१ रोजी मनसे वर्धा जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे खासदार मा.श्री रामदासजी तडस यांना निवेदन देण्यात आले.
सन २०२० मध्ये कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे वर्धा जिल्ह्यात संचारबंदी केली होती मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भाव आटोक्यात असल्यामुळे जानेवारी २०२१ पासून त्यात शिथिलता प्रदान करण्यात आली असता समाजातील लग्न समारंभ व इतर कार्यक्रम परत सुरू झाले.
मार्च २०२० पासून कोविळ -१९ च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी शिथिल करण्यात आली असता आम्हा मंगल कार्यालय, सभागृह, देकोरेशन, बिछायात, जिम मालक, मोठे व्यापारी इत्यादी व्यावसायिकांचे कंबरडे मोडले होते. त्यात आम्ही कसे बसे पूर्ववत स्थितीत होण्याचा मार्गावर आलो असता परत संचार बंदी लागू झाली व लग्नसमारंभात फक्त ५० लोकांची परवानगी, आर. टी.पी.सी.आर करून पोलिस स्टेशन मधून मिळेल असे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी दिले आहे त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण व दहशत निर्माण झाली असून मंगल कार्यालय, सभागृह, लॉनमध्ये बुकिंग केलेले कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे जर हे असेच चालत राहिले तर आम्ही जगणार कसे, आम्ही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न आम्हा व्यावसायिकांना पडला आहे आत्महत्या करावी की काय अशा प्रश्न सतत म्हणत भेडसावत आहे. कारण मंगल कार्यालय, सभागृह, लॉन, जिम, यावर सतत शासनाचा डोळा का? मॉल, कपड्यांची दुकाने, मार्केट यामध्ये असणारी गर्दी बँक, ऑफिसेस, बस स्थानक, तसेच बस मधील गर्दी, बाजार पेठ, तहसील कार्यालय, या ठिकाणी असंख्य लोकांची गर्दी असते मात्र तिथे कुठलेच निर्बंध लावण्यात आले नाही फक्त आम्हा मंगल कार्यालय, सभागृह,लॉन जिम, बिछायत, साऊंड, यांच्यावरच निर्बंध का? तसेच वरील निर्बंध हे वर्धा जिल्ह्यात लागू आहे मंगल कार्यालय, लॉनमध्ये पाहणी करणारे सबंधित कर्मचारी येऊन पाहणी करतात व धाकधपट मनमानी करून खंडणी वसूल करतात याकडे शासनाने सक्तीने लक्ष द्यायला पाहिजे. तसेच शासनाला आम्ही विनंती करतो की लग्नसमारंभात ५० लोकांची परवानगी व आर.टी.पी.सी.आर स्थगिती देऊन लग्नसमारंभात २०० लोकांची उपस्थिती परवानगी देण्यात यावी. अन्यथा मंगल कार्यालय, सभागृह, लॉन, जिम,व सर्व व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची शासनाने नोंद घ्यावी…
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, भिकमचंद टावरी, जगदीश पिसे, भारत येनोरकर, महेश घुमडे, दिलीप गंधारे, ललित लांडे, सचिन पराते, ओम जोशी, किशोर पांडे, अमोल दुढळकर, मयुर तपासे, सुनील दिवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.