Hinganghat corona positive patient escapes from Nagpur hospital?
Hinganghat corona positive patient escapes from Nagpur hospital?

नागपुर रुग्णालयातुन हिंगणघाटचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गेला पळून?
हलगर्जी पणा कुणाचा?
काय रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था भगवान भरोसे?

Hinganghat corona positive patient escapes from Nagpur hospital?

✒प्रशांत जगताप प्रतिनिधी✒
हिंगणघाट/नागपूर:- हिंगणघाट तालुक्यातील एक 27 वर्षीय कोरोना वायरस पॉझिटिव्ह रुग्ण नागपूर मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना पळून गेला. त्यामुळे सर्वीकडे खळबळ उडाली. यांची माहिती नागपुर पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेऊन हिंगणघाट येथील घरी त्याला पकडण्यात आले.

हिंगणघाट तालूक्यातील मानगाव कोपरा येथील रहिवासी असलेला या रुग्णाला डोक्याला जबर मार बसल्याने 26 फेब्रुवारी ला नागपुर मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. 3 मार्च ला त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. परंतु काही दिवसांनी बोलण्यात स्पष्टता नसल्याने तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. याच दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.

यामुळे 12 मार्च रोजी पहाटे 1 वाजता कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. 13 मार्च रोजी पहाटे 7 वाजता सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी ठेवत तो पळून गेला. सकाळी राऊंडवर असलेल्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात येताच त्याचा शोधशोध घेतला. परंतु कुठेच आढळून न आल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेतला. पोलिसांना रुग्ण हा हिंगणघाट येथील घरीच सापडला. मेडिकल ते हिंगणघाट त्याने कशाने प्रवास केला. त्याच्या संपर्कात कोण आले याचा शोध घेऊन त्यांना क्वारंटार्इं केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here