कोटींचे खंडणी व फसवणूक प्रकरण ! मुंबईतील सुप्रसिध्द बिल्डर मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा यांच्याविरूध्द पुण्यात गुन्हा दाखल.

49

कोटींचे खंडणी व फसवणूक प्रकरण ! मुंबईतील सुप्रसिध्द बिल्डर मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा यांच्याविरूध्द पुण्यात गुन्हा दाखल.

Ransom and fraud case of crores! Well known Mumbai builders Mangalprabhat Lodha and Abhishek Lodha have been booked in Pune.
Ransom and fraud case of crores! Well known Mumbai builders Mangalprabhat Lodha and Abhishek Lodha have been booked in Pune.

मुंबई दि.13 (प्रतिनिधी) :- भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतरांवर न्यायालयाच्या आदेशाने खंडणी व फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडत तो न देता तसेच पैसे भरण्यास धमकावून फसवणूक केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा (रा. अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई) तसेच ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांच्याद्वारे सुरेंद्रन नायर यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात IPC कलम 384, 385, 406, 420, 120 (ब), 34 सह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 54 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सर्व प्रकार 2013 ते मार्च 2021 या कालावधीत घडला आहे