उपजिल्हा रुग्णालय राजुरा क्षेत्रासाठी वरदान ठरणार.- खासदार बळूभाऊ धानोरकर.

58

उपजिल्हा रुग्णालय राजुरा क्षेत्रासाठी वरदान ठरणार.- खासदार बळूभाऊ धानोरकर.

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय राजुराचे लोकार्पण.

१२ कोटी ६४ लाख रुपये खर्चून प्रशस्त रुग्णालय जनसेवेसाठी सज्ज.

 Sub-district hospital will be a boon for Rajura area. - MP Balubhau Dhanorkar.
उपजिल्हा रुग्णालय राजुराचे लोकार्पण आ. सुभाष धोटे आणि खा. बाळुभाऊ धानोरकर

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

 

राजुरा:- आमदार सुभाष धोटे यांच्या अथक परिश्रमाने पुर्णत्वास आलेल्या 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय राजुराचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आणि खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले, आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या अथक परिश्रमाने सुसज्ज असे राजुरा उपजिल्हा रुग्णालय जनसेवेसाठी सज्ज झाले आहे. हे रुग्णालय राजुरा क्षेत्राच्या नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब १९ डिसेंबर २०१० रोजी राजुरा येथील कार्यक्रमात श्रेणीवर्धीत १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाची घोषणा केली होती. त्या घोषणेच फलीत आज राजुरा तालुक्यातील नागरीकांना प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे. प्रशासकिय मान्यता दिनांक. २ सप्टेंबर २०१४ निधी ७ कोटी ५८.०० लक्ष, सुधारीत मान्यता १४ कोटी १७ लक्ष, आकृती बंधानुसार १०० खाटयांच्या रूग्णालयाकरीता ९ पदांना मंजुरी. वैद्यकिय अधिक्षक वर्ग १ एक पद. वैद्यकिय अधिकारी वर्ग २ गट अ ३ पदे, स्त्री रोग व प्रसुति तज्ञ – १, वैद्यकिय अधिकारी बधिरीकरण शास्त्रज्ञ २ वैद्यकिय अधिकारी भिषक तज्ञ – १, वैद्यकिय अधिकारी बालरोग तज्ञ – १, वैद्यकिय अधिकारी अस्थिव्यंग तज्ञ – १ ,वैद्यकिय अधिकारी नेत्रशल्य चिकित्सक – १,वैद्यकिय अधिकारी अपधात कक्ष ११ वैद्यकिय अधिकारी दंत शल्य चिकित्सक – १, वैद्यकिय अधिकारी गट ब १ अशी एकुण १५ पदे मंजुर असुन त्यापैकी ११ डॉक्टर आपल्या राजुरा येथील रूग्णालयात कार्यरत असुन रिक्त पदे तातडीने भरणेबाबतचा पाठपुरवठा सुरू आहे. तसेच इतर ८० पदांपैकी काही पदे भरलेली असुन रिक्त पदे भरण्याकरीता सुध्दा प्रय्न सुरू आहेत. कोवीड -19 च्या काळात राजुरा येथील सर्व वैद्यकीय चमुंनी उत्कृष्ठ कार्य केल्यामुळे नागरीकांना उत्तम सेवा मिळाली आहे. निश्चितपणे हे रुग्णालय क्षेत्रातील जनतेच्या सेवेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा चिकिस्तक निवृत्ती राठोड, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, मुख्याधिकारी आर्शीया जुही, जेष्ठ नेते हमीदभाई, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरणुले, सं नि यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदु वाढई, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष एजाज अहमद,ॲड सदानंद लांडे, वैद्यकीय अधिक्ष डॉ. लहू कुलमेथे आणि अभियंता ए. ए. बाजारे, शाखा अभियंता वैभव जोशी, नगरसेवक, काँग्रेसचे विविध शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांनी तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे यांनी केले संचालन प्रयोग शाळा तंत्रज्ञ चंद्रकांत नेवलकर यांनी केले.