मोटारसायकल चोराच्या 8 तासाच्या आत आवळल्या मुसक्या; पवई पोलिसांची कारवाई.

56

मोटारसायकल चोराच्या 8 तासाच्या आत आवळल्या मुसक्या; पवई पोलिसांची कारवाई.

✒राज शिर्के प्रतीनिधी✒

पवई:- पोलिसांच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याच्या 8 तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. सरफराज शेख (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली असून, अजूनही काही गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.

व्यवसायाने फोटोग्राफर असणारे हर्षद दिलीप जिमकाडे यांनी आपली मनोहरनगर भागात पार्क करून ठेवलेली डीओ मोटारसायकल क्रमांक एमएच 03 सीसी 4319 ही चोरी झाल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात दिली होती. “रात्री पार्क करून ठेवलेलेली मोटारसायकल दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जावून पाहिली असता मिळून न आल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने ती चोरी केल्याची तक्रार केली होती,” पोलिसांनी सांगितले.

पवई पोलिसांना परिसरातून एक तरुण ती मोटारसायकल घेवून जातानाचे फुटेज मिळाले होते. पोलिसांनी आपल्या खबऱ्याना कार्यरत करत फुटेजच्या आधारावर त्याचा शोध सुरु केला होता. “आमच्या गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही सरफराजवर पाळत ठेवून त्याला मिलिंदनगर येथून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी प्रवीण महामुनी यांनी सांगितले.

“अटक आरोपीकडून आम्ही चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.