नुसतच लग्न जुडल होते, ती घर सोडून निघून गेली; मध्यरात्री विहिरीत आढळला तिचा मृतदेह.

51

नुसतच लग्न जुडल होते, ती घर सोडून निघून गेली; मध्यरात्री विहिरीत आढळला तिचा मृतदेह.

As soon as the marriage was over, she left home; Her body was found in the well at midnight.

✒️अमरावती जिल्हा प्रतिनिधी✒️
अमरावती ,दि.15 मार्च:- जिल्हात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आपल्याला पसंत नसलेल्या मुलासोबत लग्न परीवाराने जोडल्यामुळे एक 18 वर्षाची तरुणी घर सोडून निघून गेली होती तिचा तरुणीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला आहे त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली. धारणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तो विच्छेदनासाठी धारणी येथे पाठवला. त्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्हातील राणीगावच्या एका विहिरीत 15 मार्च रोजी मध्यरात्री एका तरुणीचा मृतदेह काही गावकऱ्यांना दिसला. त्यांनी यांची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटना स्थळी जाऊन पंचनामा करुण मृत्यदेह विहिरी बाहेर काढला. आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू केला आहे. दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याबाबतचे गूढ कायम आहे.

पोलीस कडून मिळालेल्या माहितीनुसार, संगिता भानुदास मुंडे वय 18 वर्ष रा. राणीगाव, ता. धारणी, जिल्हा अमरावती असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या इच्छे विरुद्ध तिचे लग्न तिच्या परिवाराने जोडले होते. तिचा साखरपुडाही झाला होता. पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख ठरवली होती. त्यामुळे घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. मात्र, तिला मुलगा पसंत नव्हता. त्यामुळे ती दोन दिवसांपूर्वीच घर सोडून निघून गेली होती.

कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. तिचा मृतदेह शिवाराबाहेरील विहिरीत आढळला. कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनंतर धारणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सावरकर आणि इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतदेह धारणी येथे पाठवून विच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापूर करत आहेत.