नागपूरात 20 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
✒युवराज मेश्राम नागपुर प्रतिनिधी✒
नागपूर, दि. 15 मार्च:- महिलेने दोघांना जबरण एका तरुणीवर संभोग करायला लाऊन तिचा लैंगिक छळ केला. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. गिरीधारी देवीलाल रहांगडाले 43 रा. नगपुरागाव गोंदिया, राजकुमार रमेश मरकाम 20 रा. चरगाव मंडला मध्य प्रदेश आणि 42 वर्षीय अनिता नावाची महिला अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, अनिता हिने पीडित तरुणीना नागपुरात कामासाठी आणले. पीडिता ही 20 वर्षांची आहे. पीडित तरूणी आणि अनिता यांच्यात आधीपासूनच ओळख होती. दोघेही मध्य प्रदेशातील एकाच गावाच्या राहणा-या असल्याची माहिती आहे. या ओळखीचा फायदा घेऊन अनिताने पीडित तरुणीला नागपुरात कामासाठी बोलाविले. अंबाझरी मार्गावरील एका बांधकामावर कामाला लावले. अनिताने आरोपी गिरीधारी आणि राजकुमार यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावले. तरुणीने नकार दिल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर जबरन संभोग केला. याची कुठे वाच्छता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, आणखी पुढे होणा-या अत्याचाराची गांभीर्य ओळखून पीडित तरुणीने अंबाझरी ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजकुमार आणि अनिता या दोघांना अटक केली. तर गिरीधारी फरार आहे. आरोपी महिलेच्या या वागणुकीमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.