वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समुद्रपूर येथे तालुका कार्यकारणीने महत्व पुर्ण बैठकीचे आयोजन.

54

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समुद्रपूर येथे तालुका कार्यकारणीने महत्व पुर्ण बैठकीचे आयोजन.

On behalf of the deprived Bahujan Aghadi, an important meeting was organized by the taluka executive at Samudrapur.

✒प्रशांत जगताप

समुद्रपूर:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समुद्रपूर येथे नगरपंचायत संदर्भात जिल्हा व तालुका कार्यकारणीने महत्व पुर्ण बैठकीचे आयोजन पक्षाचे जेष्ठ नेते खुशालजी लोहकरे यांच्या निवास स्थानी केले. बैठकीला अध्यक्ष स्थानी पक्षाचे निरीक्षक राजेंद्र तलवारे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून किशोर खैरखार पूर्व विदर्भ समन्वयक, जिल्हाध्यक्ष अजय घंगारे, कुणाल वासेकर, सिद्धार्थ डोईफोडे, रेणुका जाणवे, द्यानेश्वर वासनिक, विक्रांत भगत, दादाराव वाघमारे, कमलेश उमरे, किशोर यावले होते.

नगरपंचायतची निवडणूक लढवीन्यकारिता प्रत्येक वार्डात कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली व सर्व सामान्य मतदारापर्यंत पोहचून पक्षाचे विचार व इच्छुकांना स्थानिक निवडणूकी संदर्भात मार्गदर्शन करून निवडणूकीस तयार करणे पुढील आठवळ्यात कार्यकर्ता मेळावा घेऊन निवडणूकीची ताकतीने तयारी करणे असे निरीक्षक यांनी सुचविले.

बैठकीचे सूत्रसंचालन राजू धाबर्डे तर प्रास्ताविक पंखज भगत यांनी केले,प्रा. डी. एम. महाकाळे क्रांतीलाल देवळे, अभय लोहकरे, महेंद्र मून, सुरेश कुत्तरमारे, प्रशांत डेपे, प्रकाश सुटे, मनोहर शेवळे, हर्षल पाटील, राजेंद्र मून, अजय डांगरे उपस्तित होते. आभार शैलेश कुत्तरमारे यांनी केले.